ETV Bharat / city

#CORONA : औरंगाबादेत संशयित रुग्णांची संख्या 7, एक रुग्ण गायब

author img

By

Published : Mar 18, 2020, 12:17 PM IST

वैजापूर येथे एका कोरोना संशयित रुग्णाला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो रुग्णालयात आलाच नसल्याने त्या रुग्णाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे.

औरंगाबाद शासकीय रुग्णालय
औरंगाबादेत संशयित रुग्णांची संख्येत वाढ

औरंगाबाद - जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी पाच रुग्णांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. याआधीही दोन संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील संशयित रुग्णांची संख्या आता 7 झाली आहे.

औरंगाबादेत संशयित रुग्णांची संख्या 7, एक रुग्ण गायब

हेही वाचा... CORONA : ...'या' कारणामुळे झाला मुंबईच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

वैजापूर येथे एका कोरोना संशयित रुग्णाला औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, तो रुग्णालयात आलाच नसल्याने त्या रुग्णाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. त्या रुग्णाला शोधण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जात आहे.

हेही वाचा... कोरोना पोहोचला इंडियन आर्मी तळावर.. देशात प्रथमच जवानालाही कोरोनाची लागण

जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यासाठी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी एकाच दिवशी जवळपास 33 रुग्णांची तापसणी करण्यात आली. यात 28 जणांना कुठलेही लक्षण आढळून आले नाहीत. तर शासकीय रुग्णालयात 20 जणांची तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी पाच जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी दोन जण दुबईहून परतल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी पाच संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तीची प्राथमिक तपासणीत काही लक्षण अढळून आली. त्यावेळी या रुग्णाला शासकीय रुग्णालयात तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र पंधरा दिवस विलगीकरण कक्षात राहण्याच्या भीतीने तो पसार झाल्याचे समोर आले. वैजापूर येथे सरकारी दवाखान्यात सोय असताना त्याला औरंगाबाद शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देणे महागात पडले. आता हा रुग्ण पसार झाल्याने त्याला शोधण्याची नामुष्की ओढवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.