ETV Bharat / city

विद्यावेतनासाठी घाटीतील निवासी डॉक्टरांचा बंद; कोरोना रुग्णांचे उपचार थांबवण्याचा इशारा - Corona situation in aurngabad

यापूर्वीही निवासी डॉक्टरांनी थकीत विद्यावेतन तातडीने द्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र घाटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा निवासी डॉक्टरांचा आरोप आहे.

विद्यावेतनासाठी निवासी डॉक्टरांचा बंद; कोरोना रुग्णांचे उपचार थांबवण्याचा इशारा

author img

By

Published : Aug 22, 2020, 2:00 PM IST

औरंगाबाद - शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील म्हणजेच घाटीतील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतन थकल्याने हे आंदोलन त्यांनी सुरू केले आहे. तसेच पगार न दिल्यास कोरोना रुग्णांवरील उपचारही बंद करण्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे.

घाटी रुग्णालयात ४९० निवासी डॉक्टर आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना विद्यावेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आजपासून (शनिवार) कामबंद आंदोलन सुरू केले आहे. काम बंद केले असले तरी कोविड वॉर्डात काम करणारे डॉक्टर या बंदमध्ये सहभागी झाले नाहीत.

यापूर्वीही निवासी डॉक्टरांनी थकीत विद्यावेतन तातडीने द्या अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला होता. मात्र, घाटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा निवासी डॉक्टरांचा आरोप आहे.

निवासी डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून थकित विद्यावेतनासाठी घाटी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. विद्यावेतनाची रक्कम जमा झाली असून ती निवासी डॉक्टरांना लवकरच मिळेल, असे घाटी प्रशासनाकडून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही विद्यावेतन न मिळाल्यामुळे या निवासी डॉक्टरांनी आज सकाळपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच विद्यावेतन मिळाले नाही तर कोरोना रुग्णांवरील उपचारही बंद करू, असा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, आज दुपारी दोन वाजेपर्यंत पगार जमा होतील, असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आंदोलक डॉक्टरांना दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.