औरंगाबाद - शनिवारी पहाटे चारच्या सुमारास राज्यसभा निवडणुकीचा ( Rajyasabha Election 2022 ) निकाल लागला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले ( Bjp Three Candidate Win Rajyasabha Election 2022 ) आहे. तिन्ही उमेदवार निवडून आल्याने भाजपाच्या कार्यालयासमोर पेढे वाटून, फटाके फोडून, ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. यावेळी शरद पवारांचा संजय जिंकला ( Sharad Pawar sanjay Raut Win ), बाळासाहेबांचा हरला, अशा घोषणा भाजपा ( Balasaheb Thackeray Sanjay Pawar Loses Say Bjp ) कार्यकर्त्यांनी दिल्या.
एमआयएमची दोन मतं घेऊनही पराभव - राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे एमआयएमला त्यांची मत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर बैठक घेऊन अटीशर्ती नुसार पाठिंबा देत असल्याच खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं. मात्र, हिंदुत्वाची ओरड करणाऱ्या पक्षाने औरंग्याच्या कबरीवर जाणाऱ्यांचा पाठिंबा घेतला. पण, ते देवाला मान्य नव्हते. त्यामुळे शिवसेनेला त्यांनी भाजपासोबत केलेल्या धोक्याचे परिणाम दाखवले, अशी टिका भाजपा तर्फे करण्यात आली.
भाजपाने केला जल्लोष - उस्मानपुरा येथील भाजपा पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिलांनी फुगडी खेळत आपला आनंद साजरा केला. ढोल ताशे वाजवत, फटाके फोडून, पेढे वाटत आनंद साजरा केला. 'राज्यसभा झाकी है, विधान परिषद बाकी है,' अशा घोषणाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
हेही वाचा - फडणवीसांच्या व्यूहरचनेपुढे महाविकास आघाडी सपशेल फेल, धनंजय महाडिक विजयी