ETV Bharat / city

राहुल गांधीनी राफेलवर बोलू नये, कॉलेजची मूले टिंगल उडवतात- प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत राहूल गांधीवर जोरदार टीका केली. भाजप सरकारवरही यावेळी त्यांनी हल्ला चढवत काँग्रेसपेक्षा हे सरकार वेगळे नसल्याचीही टीका त्यांनी केली.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 15, 2019, 2:51 AM IST

औरंगाबाद - राहुल गांधी का आला माहीत नाही. कुंभकर्णासारखा झोपला होता तेच बरं होतं. राहुल गांधीला प्रेमाचा सल्ला देतो राफेल वर बोलू नको कॉलेजची पोरं टिंगल उडवतात. राफेलवर अधिकृत बोलणारे फक्त मनमोहन सिंह आहेत. त्यांनाच खरं माहीत आहेत. ज्यादिवशी ते बोलले त्यादिवशी मोदींचे कपडे फाटतील, अशी खोचक टीका वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी राहूल गांधींवर केली. औरंगाबाद येथे झालेल्या सभेत ते बोलत होते.

निवडणूक महत्वाची आहे, निवडणुकीत चूक झाली तर पुन्हा संधी नाही, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडून जी भाषा वापरली जात आहे ती लोकशाहीची नाही तर हुकूमशाहीची भाषा असून ती लोकशाहीत शोभत नाही. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेतून केली. तर औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजेच विधान परिषदेला एमआयएमने कोणाला मत दिले तर शिवसेनेला. त्यामुळे मुस्लिम समाजाला आवाहन करतो आपले राजकारण स्वच्छ करा. ओवेसी चांगला माणूस आहे पण त्यांच्यासोबत असलेला माणूस स्वच्छ नाही. फक्त पूर्व मतदारसंघात गफार कादरी योग्य माणूस आहे त्यामुळे वंचित आघाडीने त्यांना साथ दिली असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत इम्तियाज जलीलवर निशाना साधला.

पाच वर्षे सत्ता मिळते मात्र कायमची सत्ता मिळाल्याचा भास निर्माण केला जातो. मतांचा अधिकार राजकीय पक्षांना नाही. ज्याचे वय 21 वर्ष आहे तोच इथला राजा ठरवतो. तो दाखवून देईल की आपण राजे नाहीत आम्ही आहोत असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. गरिबांना गॅस सिलेंडर वाटण्याची योजना तेव्हा पण होती मात्र, कमी प्रमाणात होती. 2020 पर्यंत घर देणार म्हणतात इंदिरा गांधींनी देखील इंदिरा आवास योजना सुरू केली त्यात नवीन काय? रस्त्यातील घोटाळा पाहायचा असेल तर सब काँट्रॅक्टरला विचारा मग कळेल. हे खाताना काँग्रेससारखे निशाणी सोडत नाहीत यांची खाण्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसऱ्याला खायला सांगतात आणि नंतर कमिशन मागतात. अशी मिश्किल टीका आंबेडकर यांनी केली. मस्तवलेलं सरकार आणि मस्तवलेला मंत्री म्हणाला सिनेमा गृह फुल आहेत मंदी कुठे आहे. नंतर त्याने माफी मागितली. या उधळलेल्या घोड्याला लगाम घालायला हवा. बँकेतील पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर वंचितच्या हातात सत्ता द्या, आम्हीच उधळलेल्या घोड्याचा लगाम सांभाळू शकतो असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

Intro:राहुल गांधी का आला माहीत नाही, कुंभकर्ण सारखा झोपला होता बर होत, राहुल गांधी ला प्रेमाचा सल्ला देतो राफेल वर बोलू नको कॉलेज ची पोर टिंगल उडवतात. राफेल वर अधिकृत बोलणारे फक्त मनमोहन सिंह आहेत. त्यांनाच खर माहीत आहेत. ज्या दिवशी ते बोलले त्या दिवशी मोदींचे कपडे फाटतील. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या सभेत केली. Body:निवडणूक महत्वाची आहे, निवडणुकीत चूक झाली तर पुन्हा संधी नाही, मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्यांकडून जी भाषा वापरली जात आहे ती लोकशाहीची नाही तर हुकूमशहा ची भाषा असून ती लोकशाहीत शोभत नाही. अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेत केली. तर औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी म्हणजेच विधान परिषदेला एमआयएमने कोणाला मत दिल तर शिवसेनेला, त्यामुळे मुस्लिम समाजाला आव्हान करतो आपलं राजकारण स्वच्छ करा. ओवेसी चांगला माणूस आहे पण त्यांच्या सोबत असलेला माणूस स्वच्छ नाही. फक्त पूर्व मतदार संघात गफार कादरी योग्य माणूस आहे त्यामुळे वंचित आघाडीने त्यांना साथ दिली अस प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट करत इम्तियाज जलील वर निशाणा साधला.Conclusion:पाच वर्षे सत्ता मिलते मात्र कायमची सत्ता मिळाल्याचा भास निर्माण केला जातो, मतांचा अधिकार राजकीय पक्षांना नाही.ज्याचं वय 21 वर्ष आहे तोच इथला राजा ठरवतो, तो दाखवून देईल की आपण राजे नाहीत आम्ही आहोत अस प्रकाश आंबेडकर म्हणाले. गरिबांना गॅस सिलेंडर वाटण्याची योजना तेव्हा पण होती मात्र कमी प्रमाणात होती, 2020 पर्यंत घर देणार म्हणतात इंदिरा गांधींनी देखील इंदिरा आवास योजना सुरू केली त्यात नवीन काय? रस्त्यातील घोटाळा पाहायचा असेल तर सब काँट्रॅक्टरला विचारा मग कळेल. हे खाताना काँग्रेस सारख निशाणी सोडत नाही याची खान्याची पद्धत वेगळी आहे. हे दुसऱ्याला खायला सांगतात आणि नंतर कमिशन मागतात. अशी मिश्किल टीका आंबेडकर यांनी केली. मास्तवलेला सरकार आणि मस्तवलेला मंत्री म्हणाला सिनेमा गृह फुल आहेत मंदी कुठे आहे. नंतर त्याने माफी मागितली. या उधळलेल्या घोड्याला लगाम घालायला हवा. बँकेतील पैसे सुरक्षित ठेवायचे असेल तर वंचितच्या हातात सत्ता द्या, आम्हीच उधळलेल्या घोड्याचा लगाम सांभाळू शकतो अस देखील आंबेडकर म्हणाले. मुस्लिम समाज कधी न्याय देणाऱ्या समाजाच्या पाठीउभे राहिले नाहीत. दगडा खाली हात अडकले तर हात मोकळे होई पर्यंत वापर करून घेतला. मुस्लिम समाजाला आवाहन आहे. सेक्युलर संघटना पायावर उभे राहू पाहत आहे. संविधान च्या रस्त्यावर चालणार आणि अंमल करणार, मुसलमान ट्रायल वर आहे. ही त्याला आव्हान आहे, आपला माणूस चुकला तर त्याला दाखवण्याची गरज आहे अस देखील आंबेडकर म्हणाले.
Byte - प्रकाश आंबेडकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.