औरंगाबाद - जिल्ह्यात कलम 144 नुसार लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशत: बदल करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 30 मार्च ते 8 एप्रिल ऐवजी 31 मार्च ते 9 एप्रिल असा असेल, असे पत्रक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केले आहे.
नागरिकांमध्ये होता संभ्रम
जिल्हा प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल असा अंशतः लॉक डाऊनसह शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद पाळण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने 27 मार्च रोजी रात्री लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी शनिवार रविवार आणि रंगपंचमी मुळे सलग दिन दिवस बाजार पेठ बंद होती. आणि 30 च्या रात्री 12 वाजता लगेच नव्याने घोषित केलेला लॉक डाऊन त्यामुळे नागरिकांना साहित्य खरेदीसाठी वेळ देण्यात आली नसल्याने सर्वत्र ओरड होत होती. नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था असल्याने नवीन नियम लागू करत लॉक डाऊन एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला.
हेही वाचा - औरंगाबाद : तुरुंगातून बाहेर येताच त्याने पुन्हा केली 9 दुचाकींची चोरी
असे असतील लॉक डाऊनचे नियम
1. औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीत बुधवार दि. 31 मार्च रोजी 00.01 वाजेपासून ते शुक्रवार दि. 9 एप्रिल 2021 च्या 24.00 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. 30 मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये सायंकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.
2. राष्ट्रीय/राज्य / विद्यापीठ/शासन/शिक्षणमंडळ (Education Board) /( Pre-Board school ezam)/ बँक इ. स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षांर्थींना आवागमनासाठी सूट देण्यात येत आहे. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र् (Hall Ticket) सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.
3. पेट्रोलपंप सर्व नागरिकांसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत खुले राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक बाब असेल तरच पेट्रोल पंपावर जावे व गर्दी टाळावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. दुपारी 12 वाजेनंतर पेट्रोलपंप धारक यांनी फक्त अत्यावश्यक सेवेमधील व ज्यांना संचारबंदीतून सुट दिलेली आहे त्यांना इंधन पुरवठा करतील.
4. औरंगाबाद जिल्ह्यातील होम आयसोलेशन मधील कोवीड-19 रुग्णांची संख्यालक्षात घेऊन हॉटेल्सना होम डिलीव्हरी साठी रात्री 8 वाजेपर्यंत अनुमती राहिल असेही जिल्हा प्रशासनाने आदेशाव्दारे कळविले आहे.
हेही वाचा - विवाह सोहळ्यात गर्दी जमवल्याप्रकरणी मंगल कार्यालय चालकावर गुन्हा दाखल