ETV Bharat / city

जिल्ह्यात एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, रविवारी 1081 बाधित - Aurangabad corona cases

रविवारी दिवसभरात 1081 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील महिनाभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसुन आलं.

जिल्ह्यात एक लाख रुग्ण कोरोनामुक्त
जिल्ह्यात एक लाख रुग्ण कोरोनामुक्त
author img

By

Published : Apr 26, 2021, 6:32 AM IST

औरंगाबाद - मार्च महिन्यात सतत वाढत असलेली कोरोना बाधित रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात कमी होत आहे. रविवारी दिवसभरात 1081 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील महिनाभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसुन आले.

आता पर्यंत एकलाख रुग्ण झाले बरे

रविवारी दिवसभरात 1081 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 118569 इतकी झाली आहे. दिवसभरात 1693 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. त्यामुळे उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 102581 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात 27 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 2373 इतकी झाली, सध्या स्थितीत 13615 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

राज्यात मागील 24 तासांत 66 हजार बाधित-

देशात महाराष्ट्र राज्य हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्ण वाचवण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच राज्यात मागील 24 तासांत 66 हजार 19 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 61 हजार 450 रुग्णांना कोरोनामुक्त झाले आहेत. 832 रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.