औरंगाबाद - कोरोना संसर्गाने आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा सकाळी सहाच्या दरम्यान उपचार घेत असताना मृत्यू झाला. औरंगाबादेत मृतांचा आकडा आता तीनवर गेला आहे. तर एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने रुग्णांचा आकडा 29 वर गेला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाने खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घाटी रुग्णालयात 65 वर्षीय वृद्ध महिलेवर 13 एप्रिलपासून उपचार सुरू होते. या महिलेला कोरोनाचे लक्षण असल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. 16 तारखेला महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. महिलेला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनीविकार होता. त्यांची प्रकृती गेल्या तीन दिवसांपासून खराब झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची आकडा वाढत आहे. शनिवारी सकाळी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर उपचार घेणारा एका रुग्ण दगावला आहे. बायजीपुरा येथे राहणाऱ्या एका मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. काही दिवसांपूर्वी या मुलाच्या आईचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे नमुने तपासणी करण्यात आली होती. त्यात या मुलाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे निष्पन्न झाले. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 29 वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा तीनवर गेल्याने प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मृत महिलेने उपचार घेतलेल्या खासगी रुग्णालयाला महापालिकेने सील केले असून बाधित लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी सुरू असून त्यांचे अहवाल आल्यावरच पुढचे चित्र स्पष्ट होईल.
कोरोनाचा धसका; घाटीत कोरोनाचा तिसरा बळी, तर बाधितांची संख्या 29 वर
घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 65 वर्षीय महिलेचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. एका रुग्णाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने रुग्णांचा आकडा 29 वर गेला.