ETV Bharat / city

Omicron In Maharashtra : मराठवाड्यात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत वाढ, उस्मानाबादेत सर्वाधिक रुग्ण

मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव हळूहळू ( Omicron Patient Increased In Marathavada ) वाढताना दिसून येत आहे. औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबादमध्ये नवीन ओमायक्रॉनचे ( Marathavada Omicron Patient Number ) रुग्ण आढळून आले आहेत.

author img

By

Published : Jan 10, 2022, 8:28 PM IST

Omicron Patient Increased In Marathavada

औरंगाबाद - मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव हळूहळू ( Omicron Patient Increased In Marathavada ) वाढताना दिसून येत आहे. औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबादमध्ये नवीन ओमायक्रॉनचे ( Marathavada Omicron Patient Number ) रुग्ण आढळून आले आहेत. त्यात उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण असल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उस्मानाबादमध्ये आढळले 5 नवे रुग्ण -

मराठवाड्यात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण उस्मानाबाद येथे आढळून आले असून एकाच दिवशी पाच नव्या रुग्णांची भर पडल्याने चिंताही वाढले आहे. त्या पाठोपाठ औरंगाबाद, जालना आणि लातूर येथे एक नवा रुग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ओमायक्रॉनचे वीसपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये उस्मानाबाद 11, नांदेड 3, औरंगाबाद 3, लातूर 2, जालना 1 असे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये काही रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

बूस्टर डोस लसीकरणाचा सुरुवात -

कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व या आजारावर नियंत्रणासाठी उपयोगी ठरणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेत मोहिमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शासकीय यंत्रणेतील फ्रंटलाईन वर्कर, आरोग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सहविकार असलेले नागरिकांनी दुसऱ्या डोसला 9 महिने पूर्ण झाल्यानंतर लशीचा तिसरा डोस घेण्याचे आवाहन केले. जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हाधिकारी यांनी बूस्टर डोस घेतला. याप्रसंगी जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, श्रीमती संगीता चव्हाण, संगीता सानप, लसीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. महेश लड्डा यांची उपस्थिती होती.

हेही वाचा - Miraj Medical Student Omicron Positive : मिरजमधील ५६ वैद्यकीय विद्यार्थिनींना ओमायक्रॉनची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.