औरंगाबाद - टॅट्टू काढणे ही आता फॅशन होत चालली आहे. त्यात आपल्या आवडीच्या किंवा जवळच्या व्यक्तीचे नाव काढण्याची वेगळी फॅशन सुरू झाली आहे. मात्र, हीच गोष्ट अनेकांना त्रासदायक होत असल्याने काढलेले नाव खोडणाऱ्यांची संख्यादेखील वाढल्याची माहिती टॅट्टू कलाकारांनी दिली आहे.
प्रिय व्यक्तींच्या नावाने काढले जातात टॅट्टू -
एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहे. त्यात आताच्या युगात टॅट्टू काढण्याची जणू फॅशनच आली आहे. त्यात युवकांमध्ये तर टॅट्टू काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यात बायकोचे, आईचे, मुलांचे नाव, महापुरुषांचे फोटो, नक्षीदार डिझाइन काढले जात आहेत. विशेषतः आपल्या प्रियकर-प्रियसीचे नाव गोंदवण्याचे वेडच जडले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचा सहवास लाभतो, ती व्यक्ती सदैव आपल्या सोबत आहे, याचा विश्वास वाटत असल्याने टॅट्टू काढत असल्याचे युवकांचे मत आहे.
नावाचा टॅट्टू ठरत आहे त्रासदायक -
महाविद्यालयीन युवक-युवती असो की नवतरुण आयुष्याच्या एक वळणावर प्रेमात पडतात. आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी किंवा असलेले प्रेम दर्शवण्यासाठी आजच्या काळात टॅट्टूचा आधार घेतात. मात्र, जुळलेले प्रेम संबंध काही कारणास्तव कायम टिकत नाही. नात्यात दुरावा येतो आणि शरीरावर नावाचा काढलेला टॅट्टू त्रासदायक ठरू लागतो. आयुष्यभराची स्वप्न पहिल्या नंतर बिघडलेले संबंध टॅट्टू पाहून आठवत राहतात. एकेकाळी अंगावर गोंदवलेला आनंद देणारा टॅट्टू सुखदायी वाटू लागतो. त्यामुळेच गोंदवलेला टॅट्टू पुसून्याचा निर्णय घेतला जातो.
टॅट्टू मिटवण्याऱ्यांची संख्या वाढली -
काढलेला टॅट्टू आयुष्यासाठी त्रास दायक ठरू लागल्याने तो मिटवण्यासाठी विचारणा केली जात आहे. आयुष्याला नवीन सुरुवात करताना जुन्या आठवणी नकोत, याकरिता टॅट्टू नष्ट करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. टॅट्टू शॉपवर लेझर यंत्रणेने हे शक्य होत तर, काही वेळा युवक शस्त्रक्रियादेखील करून घेत आहेत. अशी माहिती टॅट्टू कलाकार सीमा कस्तुरे यांनी दिली. टॅट्टू नष्ट करून आयुष्याला नवे वळण मिळेल यात शंका नाही. मात्र, सध्याच्या काळात नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे, हे देखील प्रखरतेने समोर येत आहे.
हेही वाचा - थिनर घेऊन जाणाऱ्या टँकरची वाहनाला धडक; चार जणांचा मृत्यू तर 12 जखमी