ETV Bharat / city

औरंगाबाद : एकाच दिवशी चार रुग्णांचा 'कोरोना' चाचणी अहवाल पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

औरंगाबादमद्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढली आहे. आज एकाच दिवशी चार रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या सहा झाली आहे. यात सात वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे. तसेच आज जिल्ह्यात कोरोनाचा पहिलाच बळी गेला आहे

Aurangabad Government Hospital
औरंगाबाद शासकीय रुग्णालय
author img

By

Published : Apr 5, 2020, 3:47 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता वाढली आहे. आज एकाच दिवशी चार रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णांची संख्या सहा झाली आहे. यात सात वर्षीय मुलीचादेखील समावेश आहे. तसेच आज जिल्ह्यात कोरोनाचा पहिलाच बळी गेला आहे. मागील आठ दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या एका वृद्धाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा... औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

चार पॉझिटिव्ह अहवालांमुळे औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि कुटुंबीयांचीदेखील तपासणी करण्यात आली होती. यामध्ये चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच इतर दोघांनादेखील लागण झाल्याचे समोर आले आहे.

जलाल कॉलनीमधील 79 वर्षीय वृद्ध, सह्याद्री नगरमधील 52 वर्षीय पुरुष, देवळाई परिसरातील 38 वर्षीय व्यक्ती आणि आरेफ कॉलनीमधील 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे औरंगाबादमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. यात आरेफ कॉलनीमधील 3 रुग्णांचा समावेश आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यावरून आलेल्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यात त्यांच्या वडिलांचा समावेश आहे. तर आरेफ कॉलनीतील एक 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे आजच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.