ETV Bharat / city

'माझा कंट्रोल थेट मातोश्रीवर, सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतरच देईल' - राजीनामा दिल्याची पुडी

गेल्या अठरा तासापासून मौन धरलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर आपले मौन सोडले. आपण सध्या काही बोलणार नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर सर्वकाही बोलेल, असे अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

abdul sattar
अब्दुल सत्तार
author img

By

Published : Jan 4, 2020, 9:42 PM IST

Updated : Jan 4, 2020, 10:12 PM IST

औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजीनाम्याबाबत खुलासा केला आहे. 'आपण राजीनामा दिला, अशी पुडी सोडणाऱ्यालाच जाऊन विचार की, मी राजीनामा कधी दिला', असे बोलत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचे वृत्त नाकारले आहे. तसेच 'माझा कंट्रोल थेट मातोश्रीवर आहे' असे बोलत त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना टोला लगावला आहे.

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया.....

हेही वाचा... शिवसेनेला मोठा धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

शनिवारी (4 जाने.) सकाळी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अब्दुल सत्तार औरंगाबादच्या हॉटेलमध्ये नाराज होऊन बसल्याचे कळाले. त्यानुसार अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी अब्दुल सत्तार यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलणे करून दिले. त्यानुसार अब्दुल सत्तार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांना भेटतील, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.

हेही वाचा... बीड जिल्हा परिषदेत भाजपने मैदान सोडले, पंकजा मुंडेंकडून पराभव मान्य

यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेनेला बंडखोरांचा फटका बसल्याचे सांगत, खैरेंनी सत्तार यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेनंतर अब्दुल सत्तार यांनी आपले मौन सोडले आहे. 'मी सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर देईल', असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

हेही वाचा... 'ओवेसीला उलटं लटकवून दाढी कापेन'

'माझ्याबद्दल कोण काय बोलले, याबाबत माहिती उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यानंतर पक्षप्रमुख घेतील जो निर्णय घेतील, ते सर्वांना मान्य असेल का हे मात्र माहीत नाही. आज कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा मनस्थितीत आपण नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर सर्व काही बोलेल', असे सत्तार यावेळी म्हणाले. तसेच, 'आपल्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली ते त्यांनाच जाऊन विचारा. की, मी माझा राजीनामा दिला की नाही ते? असे सांगणारा काही सुप्रीम कोर्ट नाही. तर, माझा कंट्रोल मातोश्रीवर आहे, असा टोला अब्दुल सत्तार यांनी चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Intro:
गेल्या अठरा तासापासून मौन असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी आपलं मौन सोडलं. मी सध्या काही बोलणार नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यावर मी बोलेल अस अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं. Body:
मी राजीनामा दिला अशी पुडी सोडणाऱ्याला जाऊन विचार मी राजीनामा कधी दिला. कोणी काही म्हणू द्या मी वेळ आल्यावर बोलेल. माझा कंट्रोल थेट मातोश्री वर आहे असा टोला अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लावला. Conclusion:शनिवारी सकाळी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अब्दुल सत्तार औरंगाबादच्या हॉटेल मध्ये नाराज होऊन बसल्याचे कळाल. त्यानुसार अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हॉटेल मध्ये दाखल झाले. त्यांनी अब्दुल सत्तार यांचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत बोलणं करून दिल. त्यानुसार अब्दुल सत्तार रविवारी दुपारी दोनच्या सुमारास उद्धव ठाकरे यांना भेटतील अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेत शिवसेनेला बंडखोरांचा फटका बसल्यावर चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांच्यावर टीका केली. त्या टिके नंतर अब्दुल सत्तार यांनी मौन सोडलं.
मी सर्व प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्या नंतर देईल अस आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. माझ्या बद्दल कोण काय बोललं याबाबत माहिती उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. त्यानंतर पक्षप्रमुख घेतील तो निर्णय सर्वाना मान्य असेल का हे माहीत नाही. आज कोणत्याही प्रश्नाच उत्तर देण्याचा मनस्थितीत नाही. उद्धव ठाकरे यांना भेटल्या नंतर मी सर्व बोलेल. माझ्या राजीनाम्याची पुडी कोणी सोडली त्यांनाच विचारा की माझी राजीनामा दिला का माही ते? सांगणारा सुप्रीम कोर्ट नाही. माझा कंट्रोल मातोश्री वर आहे. असा टोला अब्दुल सत्तार यांनी खैरे यांना लगावला. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार हा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Byte - अब्दुल सत्तार - राज्यमंत्री
Last Updated : Jan 4, 2020, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.