ETV Bharat / city

औरंगाबादेत भरधाव कारच्या धडकेत महापालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Feb 11, 2021, 6:57 PM IST

भरधाव कारच्या धडकेत महापालिका कर्मचाऱ्यांच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबादेत अपघात
औरंगाबादेत अपघात

औरंगाबाद - हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर भरधाव कारने बुलेट स्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. जालना रोडवर ही घटणा घडली. मृत नागरीक महापालिकेच्या स्वच्छता विभागात जवान होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

भरधाव कारने मोटारसायकलला उडवले-

दिपक ताराचंद हटवल ( ३६, रा. गांधीनगर) असे मृताचे नाव आहे. दीपक हे रोज रात्री स्वच्छता कामगारांना त्यांची कामे नेमून घरी जातात. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दुचाकीने सेव्हन हिलकडून सिडको बसस्थानकाकडे जात होते. त्याचदरम्यान हॉटेल रामा इंटरनॅशनल समोर भरधाव कारने त्यांच्या मोटारसायकलला उडवले. या घटनेत ते दुचाकीसह खाली कोसळले आणि दहा ते पंधरा फूट फरपटत गेले.

सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद-

या घटनेत त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी तातडीने सिडको पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्यांच्या मोबाइलवरून नातेवाइकांना कॉल करून घटनेची माहिती दिली. त्यांना गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याविषयी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

हेही वाचा- पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा- फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.