ETV Bharat / city

विविध मागण्यांसाठी महावितरण अभियंत्यांचे 6 सप्टेंबरला कामबंद आंदोलन - MSEDCL latest news

मागील सात दिवसांपासून अभियंत्यांनी असहकार आंदोलन करून शासन निर्णयाचा निषेध केला मात्र कुठलाही दिलासा मिळत नसल्याने संपाचे हत्यार उगारावे लागत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

MSEDCL engineers
MSEDCL engineers
author img

By

Published : Aug 27, 2021, 8:51 PM IST

औरंगाबाद - महावितरण आणि महापारेषणमधील अभियंते 6 सप्टेंबर रोजी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती सबोर्डिनेट इंजिनियर असोसिएशन संघटनेच्या वतीने देण्यात आली. मागील सात दिवसांपासून अभियंत्यांनी असहकार आंदोलन करून शासन निर्णयाचा निषेध केला मात्र कुठलाही दिलासा मिळत नसल्याने संपाचे हत्यार उगारावे लागत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती अभियंते संपावर जाणार

महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती या वीजक्षेत्रात काम करणारे अभियंते हे महत्त्वाचे घटक म्हणून काम करतात सध्या चालू असलेल्या कोविडची महामारी असो किंवा सातत्याने येणाऱ्या वादळ, पूर, अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना अखंड वीजपुरठा देण्यासाठी अभियंते आपल्या कर्मचारी सहकाऱ्यांबरोबर जिवाची पर्वा न करता रात्रंदिवस काम करीत आहेत. त्याचबरोबर कंपनीची आर्थिक परिस्थिती उंचावण्याकरिता वीजबिल वसूलीसाठी सुद्धा झटत आहेत. परंतु तिन्ही कंपनीचे प्रशासन अभियंत्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी उदासीन असल्याचे सातत्याने संघटनेला दिसत आहेत. प्राप्त परिस्थितीमध्ये आंदोलनाची भूमिका नसावी व प्रशासनाबरोबर चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडवावे, अशी संघटनेची इच्छा होती व त्या दृष्टीने संघटनेमार्फत वेळोवेळी प्रशासनासोबत व चर्चासुद्धा केली आहे. तथापी अद्यापही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे संघटनेला संपासारखे अंतिम हत्यार उचलण्यावाचून पर्याय उरलेला नाही. त्यामुळे दिनांक 06 सप्टेंबर रोजी महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीमधील सर्व अभियंत्यांनी नाइलाजास्तव संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सबोर्डिनेट इंजिनियर असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

एक आठवड्यापासून केले असहकार आंदोलन

आपल्या विविध मागण्यांसाठी महावितरणच्या अभियंत्यांनी असहकार आंदोलन केले. कार्यालयीन कामकाजासाठी तयार केलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून अभियंते बाहेर पडले. त्यांच्याकडे असलेला अतिरिक्त कामांचा पदभार त्यांनी सोडला. सुटीच्या दिवशी कामास मनाई मात्र हे करत असताना सर्वसामान्यांची कामे अडणार नाही. त्यांना योग्य ती सेवा मिळेल, अशी खबरदारी घेतली गेली, अशी माहिती सबोर्डिनेट इंजिनियर असोसिएशनच्या वतीने देण्यात आली.

'या' आहेत मागण्या

  • 1) महापारेषण कंपनीतील एकतर्फी लादलेल्या अभियंत्यांचा स्टाफ सेटअपबाबत पूर्ण विचार करणे महापारेषणच्या प्रशासनातर्फे मागील चार वर्षांपासून स्टाफ सेटअपच्या नावाखाली अभियंत्यांची पदे कमी करण्याचा प्रयत्न चालू होता. संघटनेतर्फे सातत्याने जोरदार संघर्ष व आंदोलन करून सदर स्टाफ सेटअप रोखून धरलेला होता व प्रशासन पातळीवर चर्चा करून संघटनेची योग्य बाजू मांडण्यात आली. एकीकडे चर्चा चालू असताना संघटनेला विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारे तांत्रिक बाबीचा विचार न करता अचानक अन्यायकारक पद्धतीने नव्याने स्टाफ सेटअप 15 जून 2021पासून लागू करण्यात आला त्याची कारवाई परिमंडळस्थरावर चालू करण्यात आली आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे व नव्याने लागू केलेला स्टाफ सेटअपमुळे महापारेषण कंपनीची प्रणाली बंद पडून ग्राहकसेवेवर विपरित परिणाम होवू शकतो व कंपनीचे प्रचंड अर्थिक नुकसान होवू शकते. सदर स्टाफ सेटअपमुळे कंपनीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होवून कंपनीतील जवळजवळ 507 उपकार्यकारी अभियंते त्याबरोबर 140 अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याची पदे कमी होणार आहे. त्यामुळे सध्या कामकरीत असलेल्या अभियंत्यावर भविष्यामध्ये पदोन्नतीबाबत गंभीर परीणाम होत असल्याने प्रचंड नाराजी आहे.
  • 2) महावितरण कंपनीतील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना रद्द करण्याबाबतमहावितरणमधील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना मागील वर्षापासून बदली धोरणामध्ये राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याला प्रखर विरोध मागील वर्षी सर्व संघटनांनी केला होता त्यावेळी मा. मंत्री महोदय डॉ. नितीन राऊत यांनी हस्तक्षेप करून सदरचे धोरण पुढील वर्षी लागू न करण्याबाबत आश्वासन दिले होते तथापी सदर धोरण हयाही वर्षी राबविण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकसेवेवर विपरित परीणाम होणार आहे व त्यामुळे कंपनीची प्रतिमा मलीन होऊ शकते. तसेच सदरील धोरणामुळे कंपनीमध्ये काम करणारे महाष्ट्रातील अभियंत्याच्या वर्षानुवर्षे रखडलेल्या विनंती बदल्या सुद्धा प्रलंबित राहणार आहेत. त्यामुळे अभियंत्यामध्ये प्रचंड नाराजी आहे.
  • 3) तिन्ही कंपनीत प्रलंबित पदोन्नतीबाबत तिन्ही कंपनीमधील अभियंताचे पदोन्नती पॅनल गेले अनेक वर्षांपासून शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या परिपत्रकानुसार तसेच कंपनीच्या नियमानुसार न झाल्यामुळे अनेक अभियंते पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. उदा. महापारेषण कंपनीमध्ये 2015पासून तसेच महावितरण व महानिर्मिती कंपनीमध्ये मागील दोन वर्षापासून कोणत्याही पदाची पदोन्नती झाली नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पदोन्नती न झाल्याने अभियंत्यामध्ये असंतोष पसरलेले आहे.

नारेगाव रोड येथील महावितरण कार्यालयात अभियंत्यांनी आंदोलन केले. सर्व सामान्यांचे काम करत असताना अत्यावश्यक सेवेत असूनही नव्याने भरती केली जात नाही. त्यामुळे कामाचा येणार ताण वाढत आहे. त्याचबरोबर इतर मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून अभियंत्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. मात्र अद्याप मागण्या मान्य झाल्या नसल्याने गुरुवारी निदर्शन करण्यात आली. यावेळी 6 सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संप पुकारणार असून मागण्या मान्य न झाल्यास संप बेमुदत केला जाईल, असा इशारा सबोर्डिनेट इंजिनियर असोसिएशन संघटनेच्या वतीने देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.