ETV Bharat / city

खासदार इम्तियाज जलील यांची घाटी रुग्णालयाला चार हजार सलाईनची मदत - औरंगाबाद कोरोना अपडेट

औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सलाईन बॉटल संपल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. तसेच बाहेरुन सलाईनची व्यवस्था करावी लागत होती. याची दखल घेवुन खासदार इम्तियाज जलील यांनी घाटी रुग्णालयाला चार हजार सलाईनची मदत केली आहे.

चार हजार सलाईनची मदत
चार हजार सलाईनची मदत
author img

By

Published : Apr 30, 2021, 8:33 AM IST

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच घाटी रुग्णालय येथे सलाईन बॉटल संपल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन सलाईनची व्यवस्था करावी लागत आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेवुन खासदार इम्तियाज जलील यांनी खाजगी एजन्सीकडून रुग्णांसाठी चार हजार सलाईन बॉटल खरेदी करुन आज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिक्षक सुरेश हरबडे व इतर डॉक्टरांना सुपुर्द केले.

खासदार इम्तियाज जलील यांची घाटी रुग्णालयाला चार हजार सलाईनची मदत

इम्तियाज जलील यांनी घेतला आढावा

खासदार इम्तियाज जलील यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, औषधशास्त्र आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन वैद्यकीय उपकरणे, औषधी आणि वैद्यकीय साहित्यांची उपलब्धता व पुरवठा याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच त्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. रुग्णालयात उपचार करतेवेळी अत्यावश्यक असणाऱ्या औषधी व इतर वैद्यकीय साहित्याची कमतरता झाल्यास त्वरीत कळवावे, जेणेकरुन योग्य तो पाठपुरावा करुन औषधी व वैद्यकीय साहित्य त्वरीत उपलब्ध करुन देता येईल. असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

गरीब रुग्णांचे हाल होत असल्याने केली मदत

सध्या रुगणालयात उपचार घेत असलेले बहुतेक रुग्ण हे ग्रामीण भागातील व इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे रुग्णांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना राहणे व भोजणाची व्यवस्था करणे अवघड होत आहे. त्यातच सलाईन बॉटल खरेदी करण्यासाठी पैसे कुठुन आणावे? असा गंंभीर प्रश्न नातेवाईकांना पडला आहे. सद्याच्या संचारबंदीच्या काळात सर्व कामधंदे बंद असल्याने नातेवाईकांवर अधिकचा आर्थिक बोजा झाला आहे. तसेच इतर कोणीही उसने पैसे देण्यास तयार नसल्याने रुग्णांना वेळेवर सलाईन उपलब्ध होत नाही. सदरील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत खासदार इम्तियाज जलील यांनी तत्काळ खासगी एजन्सीकडून रुग्णांसाठी चार हजार सलाईन बॉटल खरेदी करुन, शासकीय वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाकडे सुपुर्द केले. यावेळी घाटी प्रशासनातील डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अब्दुल राफे, डॉ. मुक्तदीर अन्सारी तसेच शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते.

हेही वाच - इस्राईलच्या बॉनफायर फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; कित्येक जणांचा मृत्यू, १००हून अधिक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.