ETV Bharat / city

एमआयएम-वंचित आघाडीचा घटस्फोट; एमआयएमने मागितल्या होत्या ५० जागा - MIM-BVA break they alliance

वंचितने विधानसभेसाठी एमआयएमला आठ जागा देऊ केल्या होत्या. मात्र एमआयएमने 50 जागांची मागणी केली होती. मात्र दोघांमध्ये जागा वाटपाचा मेळ न बसल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

एमआयएम - वंचित आघाडीचा
author img

By

Published : Sep 6, 2019, 5:45 PM IST

Updated : Sep 6, 2019, 7:15 PM IST

औरंगाबाद - लोकसभेत एकत्र निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आगामी विधानसभा निवडणूक वेगळे लढणार असल्याचे एमआयएमने प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्ट केले आहे. वंचित आघाडीने विधानसभा निवडणुकीत एमआयएमला आठ जागा दिल्याने एमआयएमने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला 98 जागांची मागणी केली होती. मात्र नंतर यादीत सुधार करून 76 जागा देण्याची मागणी एमआयएमने केली होती. त्यापेक्षा आणखी काही जागा सोडण्याची तयारी एमआयएमने केली होती. मात्र वंचितने एमआयएमच्या ताब्यात असलेली औरंगाबाद मध्यची जागा वगळून आठ जागा देऊ केले. त्यामुळे हे जागावाटप मंजूर नसल्याने अखेर एमआयएमने आघाडीतून माघार घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित आणि एमआयएम मधे जागावाटपाचा पेच सुटत नव्हता. आधी जागावाटप करून घ्या असा आग्रह एमआयएम पक्षातर्फे करण्यात होता. तर दुसरीकडे वंचितने राज्यभर प्रत्येक मतदार संघात आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. त्यामुळे एमआयएमची चिंता वाढत असल्याचे स्पष्ट दिसून येत होते.

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक वेळा वंचित सोबत बोलणी केली. इतकेच नाही काही दिवसांपूर्वी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष असोसूद्दीन ओवेसी यांच्यात पुण्यात बंद दाराआड चर्चा देखील झाली होती. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा सुटेल असे वाटत होते. मात्र वंचित आघाडीने एमआयएमचा जागावाटपाचा प्रस्ताव फेटाळत अवघ्या आठ जागा दिल्याने एमआयएमने आघाडीतुन वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएम पक्ष 2014 मध्ये 24 जागांवर लढला होता. त्यापैकी दोन जागांवर त्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर पक्षाची ताकद वाढली आहेत. राज्यात शंभरहून अधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे किमान 50 जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे न झाल्याने आघाडीतून बाहेर पडत असल्याच एमआयएमने प्रसिद्धी पत्रक काढून कळवले आहे. इतकेच नाही तर प्रकाश आंबेडकर यांचा आदर करत होतो आणि करत राहू असे देखील पत्रात नमूद करत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
वंचित काँगेस सोबत जाणार असल्याची चर्चा -

गेल्या काही दिवसांपासून वंचितकडून काँग्रेससोबत बोलणी चालू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यासाठी वंचित 50 - 50 फॉर्म्युला देऊ शकते. अशी चर्चा आता रंगली आहे. त्यामुळेच वंचितने आपल्या आघाडीत एमआयएमला कमी जागा देऊ केल्या होत्या. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Intro:लोकसभेत एकत्र लढलेले एमआयएम आणि वंचित झाले विभक्त, जागावाटपात आकडेमोड न जुळल्याने एमआयएम झाला वेगळा. वंचित कडून एमआयएमला देऊ केल्या होत्या आठ जागा, एमआयएमला 50 जागांची होती अपेक्षा. एमआयएमची ताकद असलेल्या जागांवर वंचितने केला होता दावा, त्यामुळे एमआयएमने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

Body:एमआयएमने प्रसिद्धी पत्रक काढून वेगळं होण्याचा निर्णय केला जाहीर

Conclusion:
Last Updated : Sep 6, 2019, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.