औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, फेसबुक लाईव्ह करत त्यांनी विष घेतले. काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे ते त्रस्त होते. त्यातून त्यांनी विष प्राशन केले. मुंबईत जेजे हॉस्पिटलमधे त्यांना भरती करण्याच आले आहे.
मराठा क्राती मोर्चासाठी मोठा धक्का - फेसबुक लाईव्ह सुरू असताना त्यांनी विष प्राशन केले. मुंबईतच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठा क्रांती मोर्चाबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये केरे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप होता. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. हा मराठा क्राती मोर्चासाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे.
सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार - या घटनेआधी रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडली होती. मी आतापर्यंत मराठा बांधवांसाठी लढत आलो. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्न करत आलो आहे. माझे काम प्रामाणिक असल्यामुळे अनेकदा त्याची दखल घेण्यात आली. मात्र, काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमुळे माझी बदनामी झाली असे केरे यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी लाईव्हमध्येच विष प्राशान केले. त्यांच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.