ETV Bharat / city

राज्याला मुख्यमंत्री पाहिजे...; मराठा क्रांती मोर्चाचे औरंगाबादेत जाहिरताबाजीसह मुखवटे आंदोलन - मराठा क्रांती मोर्चा

मुख्यमंत्री पाहिजे अशी जाहिरात हातात घेऊन मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या क्रांती चौक भागात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे मुखवटे लावून आंदोलन केले.

मराठा क्रांती मोर्चा
author img

By

Published : Nov 21, 2019, 8:19 PM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री पाहिजे अशी जाहिरात हातात घेऊन मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. औरंगाबादच्या क्रांति चौक भागात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे मुखवटे लावून स्थीर सरकार न देणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेध केला.

मनोज पाटील - समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

हेही वाचा - शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत कमी - मकरंद अनासपुरे

21 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे मतदान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. असे असताना देखील अद्याप कुठल्याही राजकीय पक्षांनी राज्यात सरकार स्थापन केलेले नाही. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री नसल्याने राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने तातडीने राज्यात नवं स्थीर सरकार स्थापन करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने औरंगाबादेत केली.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आंदोलन करत असताना हातात मुख्यमंत्री पाहिजे, अशी जाहिरात पकडली. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी हवी असलेली पात्रता नमूद करण्यात आली होती. राज्यात सरकार स्थापन करण्यावरून मोठा गोंधळ सर्वच राजकीय पक्षांनी निर्माण केला आहे. त्यामुळे मतदान केलेला मतदार संभ्रम अवस्थेत सापडला आहे. तसेच राज्यातील जनतेची दिशाभूल राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला. पुढील चार दिवसांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने राज्यात स्थिर सरकार स्थापन करावं, अन्यथा मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात बंदचे आवाहन करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Intro:मुख्यमंत्री पाहिजे अशी जाहिरात हातात घेऊन मराठा क्रांतीमोर्चा तर्फे आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादच्या क्रांतिचौक भागात मराठा क्रांतीमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चेहऱ्यावर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांचे मुखवटे लावून स्थिर सरकार न देणाऱ्या राजकीय पक्षांचा निषेध केला. Body:21 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचे मतदान होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. अस असताना देखील अद्याप कुठल्याही राजकीय पक्षांनी राज्यात सरकार स्थापन केलेले नाही. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून राज्यात मुख्यमंत्री नसल्याने राज्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने तातडीने राज्यात नवं स्थिर सरकार स्थापन करण्याची मागणी मराठा क्रांतीमोर्चाने औरंगाबादेत केली.Conclusion:मराठा क्रांती मोर्चाच्या समनवयकांनी आंदोलन करत असताना हातात मुख्यमंत्री पाहिजे अशी जाहिरात पकडली. या जाहिराती मधे मुख्यमंत्री पदासाठी हवी असलेली पात्रता नमूद करण्यात आली होती. राज्यात सरकार स्थापन करण्यावरून मोठा गोंधळ सर्वच राजकीय पक्षांनी निर्माण केला आहे. त्यामुळे मतदान केलेला मतदार संभ्रम अवस्थेत सापडला असून राज्यातील जनतेची दिशाभूल राजकीय पक्ष करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आला. पुढील चार दिवसांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने राज्यात स्थिर सरकार स्थापन करावं अन्यथा मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यात बंदच आवाहन करू असा इशारा आंदोलन कर्त्यांनी दिल.
Byte - मनोज पाटील - समन्वयक मराठा क्रांती मोर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.