ETV Bharat / city

Mahavikas Aghadi Protest : नवाब मलिक अटकेविरोधात महाविकास आघाडीचे औरंगाबादेत आंदोलन

नवाब मलिक यांच्यावर ईडीने (Nawab Malik Arrest) केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्यावतीने क्रांती चौकात आंदोलन (Mahavikas Aghadi protest in Aurangabad) करण्यात आले. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी घोषणाबाजी केली.

Mahavikas Aghadi Protest
महाविकास आघाडीचे क्रांती चौकात आंदोलन
author img

By

Published : Feb 25, 2022, 3:07 PM IST

Updated : Feb 25, 2022, 4:39 PM IST

औरंगाबाद - नवाब मलिक यांच्यावर ईडीने (Nawab Malik Arrest) केलेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्यावतीने क्रांती चौकात आंदोलन (Mahavikas Aghadi protest in Aurangabad) करण्यात आले. यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप विरोधी घोषणाबाजी केली. तसेच मलिक यांच्या कारवाईविरोधात निदर्शने केली.

प्रतिक्रिया देताना शिवसेना आमदार अंबादास दानवे

दाऊदला पकडून आणा -

नवाब मलिक यांनी लाखात घेतलेल्या मालामत्तेला कोटींमध्ये दाखवत ईडीने कारवाई केली आहे. भाजप आपल्या सत्तेचा गैरवापर करत असून, सरकारी तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे. भाजप विरोधात असल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई केली जात आहे. केंद्रात भाजप सरकार आहे, त्यांनी दाऊद इब्राहिमला पकडून आणावे अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी केली. तर महाविकास आघाडी नवाब मलिक यांच्या पाठीशी उभी आहे. अशा खोट्या कारवायांना घाबरणार नाही, असे मत काँग्रेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Feb 25, 2022, 4:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.