औरंगाबाद गणेश उत्सवात Ganeshotsav सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठान Kulaswamini Pratishthan तर्फे दरवर्षी नाविन्यपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा केला जातो. यावर्षी देखील आगळा वेगळा झोपळ्यावर झुलणारा पर्यावरण पूरक बाप्पा साकारण्यात येणार आहे. इतकेच नाही तर पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचे काम मंडळातर्फे करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
झोपल्यावर झोपणारा बाप्पा देणार सामाजिक संदेश
सिडको येथील कुलस्वामिनी प्रतिष्ठान यंदा झोपल्यावर झुलणारा बाप्पाचा देखावा साकारत आहे. वीस फूट उंचावर ३० फूट रुंद ४० फुल लांबी असलेला मोठा झोका तयार करण्यात आला आहे. दोरीच्या माध्यमातून हा झोका उभारण्यात आला असून रोप ट्रेच्या माध्यमातून हा भव्य बाप्पा साकारण्यात आला आहे. या ट्रे मध्ये गहू पेरण्यात आले होते. वरच्या बाजूने पाहिले तर हिरवागार झाडांचा बाप्पा दिसेल तर खाली एक हौद करण्यात आला असून त्यात प्रतिबिंब दिसेल. इतकेच नाही सेल्फी काढण्यासाठी दोनही बाजूनी आरशे लावण्यात आले आहेत ज्यामध्ये बाप्पा पूर्णपणे दिसेल. अशी माहिती विलास कोरडे यांनी दिली.
दोन वर्षांनी आला उत्साह
कुलस्वामिनी प्रतिष्ठान तर्फे मागील अकरा वर्षांपासून गणेश उत्सवात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. कोरोना काळात सण सोहळे साजरे करण्यात निर्बंध असल्याने दोन वर्षे उपक्रम राबविण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी पुन्हा उत्साहात उत्सव साजरा करता येणार आहे. त्यामुळे नव्या जोमाने तयारी करण्यात आली आहे. झोपाळ्यावर आराम करणाऱ्या बाप्पाच्या माध्यमातून पर्यावरण बचाव करण्याचा अनोखा संदेश देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर सौर ऊर्जा, शेततळे बाबत जनजागृती करण्यात येईल अशी माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास कोरडे यांनी दिली.
हेही वाचा Ganeshotsav 2022 पुण्यातील धनकवडी येथील 9 गणेश मंडळांची एकत्रित सार्वजनिक मिरवणूक