औरंगाबाद - सुजय विखे यांनी खाजगी विमानाने अहमदनगरला आणलेल्या १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने या विमान प्रवासाबाबत आणि आणलेल्या सामानाबाबत पूर्ण माहिती मागवली आहे. १० ते २५ एप्रिल पर्यंत किती खाजगी विमानं आली आणि त्यात काय समान होते याचीही माहिती कोर्टाने मागितली आहे. विमानतळ प्राधिकरणाने ही सगळी माहिती कोर्टाला द्यायची आहे.
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर उपस्थित झाले प्रश्न
इंजेक्शन बाबत प्रकरण चर्चेला आल्यावर नगर च्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सुजय विखे यांनी केलेल्या कृतीचे समर्थन केले होते. दीड हजार इंजेक्शन आणण्यात आले होते. त्यावेळी सर्व नियमांचं पालन करण्यात आले अस सांगण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीवर ही कोर्टाने संशय आणि नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी यांचे वर्तन खासदार सुजय विखेना वाचवण्यासारखे असल्याचं कोर्टाने म्हटलंय.
विमानाचा तपशील द्यावा
भाजप खासदार असलेले सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यात खाजगी विमानाने रेमडीसीवर आणले होते. त्यानंतर याबाबत वाद सुरू झाला होता. त्यांनी सादर केलेले बिल पुणे येथील एका कंपनीचे आहे. विमान दिल्लीवरून आले. त्यात असलेले बॉक्स याबाबत संशय आहे. याप्रकरणी हाय कोर्टात याचिका सुद्धा दाखल झालीये, या याचिकेवर पुढील सूनवणीं ३ मे ला होणार आहे
हेही वाचा - रणधीर कपूर यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह, कोकिलाबेन रुग्णालयात दाखल