ETV Bharat / city

Aurangabad School Initiative : ओमायक्रॉनमुळे पुन्हा शाळा बंद झाल्यास, मनपा सुरू करणार 'शाळा आपल्या दारी' उपक्रम - Online Learning Method

राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत ( Omicron In Maharashtra ) आहे. यापार्श्वभूमीवर शाळा पुन्हा बंद ( Schools Closed Due To Omicron ) करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास औरंगाबाद महानगरपालिकेने ( Aurangabad Municipal Corporation ) त्यावर पर्याय काढला आहे. शाळा बंद कराव्या लागल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून 'शाळा आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येणार ( School At Your Home Initiative ) आहे.

ओमायक्रॉनमुळे पुन्हा शाळा बंद झाल्यास, मनपा सुरू करणार 'शाळा आपल्या दारी' उपक्रम

author img

By

Published : Dec 30, 2021, 3:07 PM IST

औरंगाबाद - राज्यात ओमायक्रॉनचा ( Omicron In Maharasthra ) धोका पाहता पुन्हा नव्याने निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात शाळांवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत ( Schools Closed Due To Omicron ) नाही. अस झालं तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, त्यामुळे मनपा तर्फे ( Aurangabad Municipal Corporation ) पुन्हा एकदा 'शाळा आपल्या दारी' उपक्रम ( School At Your Home Initiative ) राबवणार असल्याची माहिती सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली आहे.

ओमायक्रॉनमुळे पुन्हा शाळा बंद झाल्यास, मनपा सुरू करणार 'शाळा आपल्या दारी' उपक्रम
दोन वर्षात झाले नुकसान

मार्च 2020 मध्ये आलेल्या कोरोनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना सर्वाधिक हानी झाली. विशेषतः प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा करावा लागला. डिसेंबर २०२१ मध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या. मात्र, त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांमध्ये लिखाण कौशल्य कमी झाल्याचे तसेच आकलन क्षमतेवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यात अनेक विद्यार्थी शाळेत बसण्यास तयार नसल्याने अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान शाळा प्रशासन आणि शिक्षकांसह पालकांसमोर उभे राहिले आहे.

गरीब मुलांचे अधिक नुकसान

कोरोनामुळे शाळा बंद झाल्यानंतर मोठ्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाची पद्धत ( Online Learning Method ) सुरू झाली. विद्यार्थी मोबाईलद्वारे ऑनलाईन शिक्षण घेऊ लागले. मात्र, ही पद्धत ग्रामीण भागांमध्ये किंवा लहान शाळांमध्ये सुरू करता आली नाही. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाहीत. त्यात इंटरनेटसाठी पैसे भरण्याची त्यांची कुवतही नव्हती. कोरोनामुळे रोजगार गेल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे गरीब मुलांचे ऑनलाइन शिक्षणात खूप मोठे नुकसान झाले आहे. कारण जवळपास 30 ते 40 टक्के गरीब विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यात ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाला तर, ही मुलं पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहातून दूर जाण्याची भीती वर्तवली जात आहे.

'शाळा आपल्या दारी' उपक्रम

कोरोना काळात शाळा बंद झाल्याने महानगरपालिकेच्या शाळेत शिकणार्‍या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं, यासाठी महानगरपालिकेच्यावतीने काही ठोस उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये 'शाळा आपल्या दारी' हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये मनपा शाळेतील शिक्षक प्रत्येक कॉलनीत जाऊन काही काळ तिथे राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देत होते. झाडाखाली, मंदिरात जिथे जागा मिळेल तिथे छोट्या छोट्या गटात मुलांना शिक्षण देणं सुरू केलं होतं. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहिले. त्यात आता नव्याने ओमायक्रॉनचा धोका निर्माण झाला आणि शाळा बंद झाल्या तर हा उपक्रम पुन्हा राबवण्यात येईल, अशी माहिती मनपाचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांनी दिली. मनपाचे सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.