औरंगाबाद - मोठ्या बहिणीचा पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या दोघांना 25 वर्षीय तरुणीने भर चौकात पंधरा मिनिट चोप दिला. सूतगिरणी चौकात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लाथा-बुक्क्यांनी केली दोघांची धुलाई -
दरम्यान, शुक्रवारी आपल्या लहान भावाला कोचिंग क्लासमध्ये सोडण्यासाठी घराखेदा परिसराकडे निघाली होती. ती औरंगपुरा येथून जात असताना दोघांनी तीचा पाठलाग सुरू केला. थोड्या वेळाने ते थांबतील म्हणून तिने दुर्लक्ष केले. मात्र, दर्गा रस्त्यापर्यंत त्यांनी पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान, तीने हा प्रकार एका ठिकाणी थांबून तीच्या लहान बहिणीला कळवला. लहान बहिणीने तिला न थांबता पुढे जाण्यास सांगितले. तेवढ्यात प्रणाली तेथे पोहोचली. अखेर दोघींची सहनशक्ती संपल्याने ती सूतगिरणी चौकात थांबली आणि त्यांना जाब विचारला. तसेच प्रणालीने हेच का ते दोघे, असे विचारत दोघांची धुलाई सुरू केली. यावेळी तिने लाथा-बुक्क्यांचा त्यांच्यावर वर्षाव सुरू केला. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले.
हेही वाचा - बीडमध्ये विवाहितेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल