चंद्रपूर - क्रेटा गाडी आणि ट्रॅक्टरच्या झालेल्या भीषण ( Creta Tractor Accident In Chadrapur ) अपघातात गडचिरोलीतील भाजपाच्या जिल्हा सचिवाचा ( Gadchiroli BJP Secretory Death In Accident ) जागीच मृत्यू झाला तर त्यांचे भाऊ गंभीर जखमी झाले. आनंद गण्यारपवार (४५ ), असे भाजपाच्या जिल्हा सचिवांचे नाव आहे. ते भाजपाचे गडचिरोली जिल्हा सचिव होते. तर अतुल गण्यारपवार (४७), असे गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या भावाचे नाव आहे. दोघेही रा. चामोर्शी जि. गडचिरोली येथील रहिवासी होते. तर कारचा चालक हा सुदैवाने एअरबॅगमुळे बचावला आहे. ही घटना ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रणमोचन फाट्याजवळ घडली.
असा झाला अपघात -
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेले अतुल गण्यारपवार यांना कृषी बाजार समीतीशी संबंधित कामानिमित्ताने मुंबई येथे जायचे होते. त्यासाठी ते आपल्या कारने नागपूर येथे जाण्यासाठी घरून सकाळीच निघाले होते. त्यांच्या सोबत त्यांचे चुलत भाऊ आनंद गण्यारपवार हे सुध्दा होते. तर त्यांची कार त्यांचा ड्रायव्हर चालवत होता. तेव्हा ब्रम्हपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील रणमोचन फाट्याजवळ एका ट्रॅक्टरची कारसोबत जोरदार धडक झाली. अपघातील ट्रॅक्टरच्या इंजिनचे मधातून दोन तुकडे झाले. तर कारसुध्दा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात फेकल्या गेली. ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातातील जखमीला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल आले आहे. अपघात घडलेल्या ट्रॅक्टर हा अवैध रेती उत्खनन करणारा ट्रॅक्टर होता. त्यामुळे तो विनाक्रमांकाचा आहे. ट्रॅक्टरचे मालक रुई येथील असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती कळताच ब्रह्मपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
अपघाताला रेती तस्करीची किनार -
अपघातातील ट्रॅक्टरची ट्राॅली रिकामी होती. मात्र, तो ट्रॅक्टर जुगनाळा या गावात रेती खाली करून येत होता. तेव्हा हा अपघात झाला. ब्रम्हपुरी तालुक्यातील बहुतांश रेती घाटाचे लिलाव झाले नसताना मागील कित्येक महिन्यापासून वैनगंगेच्या पात्रातून रेतीची सर्रास चोरी केली जात आहे.
हेही वाचा - RRB NTPC : रेल्वे परीक्षेवरून विद्यार्थ्यांच्या उद्रेकानंतर रेल्वेला सुचले शहाणपण; घेतला 'हा' निर्णय