औरंगाबाद - पडेगाव परिसरातील अंन्सार कॉलनीत राहणाऱ्या सेवानिवृत सहाय्यक फौजदार महिलेचे डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने घर फोडून जवळपास २ लाख ३७ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. औरंगाबाद येथील छावणी परिसरात ही घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशी माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे.
लाखोंचा ऐवज केला लंपास -
शेख आफताब शेख मुनीर(19) (रा. लोकसेवा दुध डेअरी परिसर, अंन्सार कॉलनी, पडेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पडेगावातील अन्सार कॉलनीत राहणाऱ्या सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार शमा नियाज अहेमद शेख (60) यांचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला असे पोलिसांनी सांगिलते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख आफताब याच्या घरावर छापा मारला असता त्याने घरफोडी केल्याची कबूली दिली.
1 लाख 86 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त -
पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्याच्याकडून सोन्याचे एक गंठण, अंगठी, दोन बांगड्या, कानातील झुमके, पाच मोरण्या असा एकूण 1 लाख 86 हजार 525 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक आघाव, साहायक निरीक्षक आघाव, सहाय्यक निरीक्षक शिंदे यांच्यासह त्यांच्या पथकांने ही कारवाई केली.
हेही वाचा - टोमण्यांना वैतागून उचलले टोकाचे पाऊल; घरजावयाने केली सासू, पत्नीची गोळी झाडून हत्या