कन्नड-(औरंगाबाद) - तालुक्यातील गौताळा अभयारण्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून प्रतिबंधित क्षेत्रात अवैधरित्या पार्टी करणाऱ्या 17 जणांविरुद्ध वनविभागाने कारवाई केली. तसेच आरोपींकडून 44हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाई करण्यात आलेले काही पर्यटक कन्नड व जळगाव जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आहेत.
निसार खा सरदारखा, सय्यद जमील पठाण, शेख तौसीफ रा. कन्नड , शेख नेईन शेख रियाझ , नासीफ सिराज शेख रा. कन्नड , नासेर खा रसीद खा रा. कन्नड , शेख इफ्तीयार शेख अहमद रा.कन्नड , शेख हाफिज शेख जमील रा. कन्नड , जुनेद शेख अकबर सर्व राहणार कन्नड , तर जगदीश आत्मराम गोसावी (रा.पाचोरा जळगाव), युनुस युसुफ पिंजारे (रा भडगाव जळगाव) , पंकज संजय पाटील (रा.पाचोरा जळगाव), उमेश तुकाराम पाटील (रा भडगाव जळगाव), गौरव दिलीप पाटील (रा भडगाव जळगाव), विजय ऋषिकेश पाटील (रा भडगाव जळगाव), अमोल मुरलीधर बोरसे (रा भडगाव जळगाव), राहुल राजेंद्र मोरे (रा.पाचोरा जळगाव) अशी सर्व आरोपींची नावे आहेत.
हे सर्व नागद वनपरिक्षेत्र येथील गौताळा अभयारण्यातील प्रतिबंधित क्षेत्रात विविध ठिकाणी बसून दारू पिऊन पार्टी करत होते. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडून कारवाई केली. या सर्व पर्यटकांना ताब्यात घेऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 1 (ड) व वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार गुन्हा नोंद करून आरोपींना तब्बल 44500 रु दंड लावण्यात आला.
सदर कारवाई मुळे चोरून लपून छपून गौताळा अभयारण्यात प्रवेश करून अवैधरित्या पर्यटन, पार्टी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.