ETV Bharat / city

औरंगाबादेत किरकोळ कारणावरून दोघांना भोसकले

हमीद सय्यद (29) व सय्यद महेमुद अमीर (50, रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे असून, त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी दिले आहेत. तर हल्ल्यात शेख नईम आणि शेख फहिमोद्दीन जखमी झाले आहेत.

knife attack
किरकोळ कारणावरून दोघांना भोसकले
author img

By

Published : Aug 11, 2020, 9:14 PM IST

औरंगाबाद - कचरा टाकण्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या पतीसह तिच्या दिराला चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेनंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चालू हल्ला झाल्यावर ते दोघेही रस्त्यावर पडले असताना नागरिकांनी त्यांची मदत केल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या दोघांना जिन्सी पोलिसांनी रात्री अटक केली आहे.

हमीद सय्यद (29) व सय्यद महेमुद अमीर (50, रा. रहेमानिया कॉलनी) अशी आरोपींची नावे असून, त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वाडकर यांनी दिले आहेत. तर हल्ल्यात शेख नईम आणि शेख फहिमोद्दीन जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होते. त्यानंतर त्यांनी नागरिकांची मदत घेत रुग्णालयात दाखल झाले.

या प्रकरणात शेख परवीन बेगम शेख फहीमोद्दीन यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, शेख परवीन या पती, दीर, सासु सासऱयांसह रेहमानिया कॉलोनी येथे राहतात. परवीन यांचे पती मिस्तरी काम करुन कुटूंबाचा गाडा चालवतात. परवीन यांच्या घराच्या शेजारील इमारतीत आरोपी हमीद सय्यद व त्याचे कुटूंब राहतात. हमीद यांची पत्नी अंजूम, तिची जाऊ आसमा व परवीन यांच्यात कचरा टाकण्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असे.

9 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता आरोपी हमीदच्या पत्नीने परवीन यांच्या घरात कचरा टाकला. त्यामुळे परवीन या तिला समजावण्यासाठी गेल्या असता, अंजुम व तिची सासू जमीला यांनी परवीनला मारहाण केली. परवीनने याची माहिती पतीला सांगितली, त्यानुसार परवीनचा पती घरी आला, त्याने दोघांना समजावून सांगितले व तो पुन्हा कामाला निघून गेला.

त्यानंतर जमीलाचा पती तथा आरोपी महेमुद हा परवीन यांच्या घरी आला, त्याच्यासोबत दोनजण होते. त्यांनी दरवाजाला लाथा मारणे सुरू केले. त्यामुळे परवीन यांनी पुन्हा पतीला फोन करून बोलवले. परवीनचा पती घरी येताच आरोपी महेमुद व त्याच्या साथीदारांनी त्यांना शिवीगाळ सुरु केली. तसेच मुलगा जावेद, हमीद व जावई ईमरान यांना बोलावून घेतले. आरोपींनी परवीनच्या पतीला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपी हमीद, महेमुद व त्यांच्या दोन साथीदारांनी परवीन यांच्या पतीचे हात पकडले, तर जावेदने त्याच्या पोटात चाकू भोसकला.

परवीनचा दिर नईम हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याच्या पोटात देखील जावेदने चाकू भोसकला. यानंतर दोन भावांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात सय्यद महेमुद (50), सय्यद हमीद (29), सय्यद जावेद (26), जमीला महेमुद सय्यद (47), अंजुम हमीद सय्यद (25), समीना इमरान (24), आसमा जावेद सय्यद (22) व इमरान (27) या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपास करून दोन अरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त करणे, तसेच आरोपींच्या साथीदारांना देखील अटक करणे बाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील गौतम कदम यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार आरोपींना 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.