औरंगाबाद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शहरातील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. आनंद कस्तुरे असे तक्रारदाराचे नाव असून रात्री उशिरा स्टेजवर माईक घेऊन भाषण केले. लाऊड स्पीकर सुरू ठेवला, जबाबदार पदावर असूनही न्यायालयाचा अवमान केला म्हणून ही तक्रार देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० नंतर लाऊड स्पीकर सुरू ठेवणे गुन्हा ठरतो. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) औरंगाबाद दौऱ्यावर ( Chief Minister visit to Aurangabad ) असताना रविवारी रात्री त्यांनी तीन ठिकाणी जाहीर भाषण केली. क्रांतीचौक, पदमपुरा, सुत गिरणी भागात त्यांनी जाहीर भाषण केले. हातात माईक घेऊन लाऊड स्पिकरवर भाषण करत उपस्थितीत नागरिकांना संबोधित केले.
न्यायालयाचा अवमान : क्रांती चौक येथे नियुक्त जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ आयोजित कार्यक्रमात रात्री अकरा वाजता मुख्यमंत्री शिंदे दाखल झाले. त्यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यावेळी जाहीर भाषण त्यांनी केले. रात्री बाराच्या सुमारास ते आमदार संजय शिरसाट यांचे कार्यालय कोकणवाडी भागात आले. त्यावेळी देखील फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, त्यानंतर त्यांनी जाहीर भाषण केले. पुढे ते आमदार संदीपान भूमरे यांच्या कार्यालयात आले तिथे देखील त्यांनी जाहीर भाषण केले. त्यात त्यांनी स्वतः रात्रीचे एक वाजले असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाचा अवमान त्यांनी केल्याने आपण तक्रार दिल्याचे तक्रारदार आनंद कस्तुरे यांनी सांगितले.
'त्यांनी काळजी का घेतली नाही' : जाहीर कार्यक्रमात नियम मोडले गेले तर आयोजकांवर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल व्हावा. मात्र मुख्यमंत्री असल्याने त्यांची स्वतःची जबाबदारी म्हणून त्यांनी माईकवर बोलणं टाळलं पाहिजे होते. म्हणून त्यांच्या विरोधात ही तक्रार देण्यात आली आहे. सर्व सामान्यांना नियम आहेत. एखाद्या जयंतीला आपण वेळेत कार्यक्रम झाले नाही तर कारवाई करतात तशीच कारवाई करावी, कायदा सर्वांना असावा म्हणून तक्रार दिल्याचं तक्रारदार आनंद कस्तुरे यांनी सांगितले.
हेही वाचा - Aaditya Thackeray Kolhapur Tour : अन् स्टेज सोडून थेट जनतेतून आदित्य ठाकरेंचे दमदार भाषण; पाहा व्हिडिओ