ETV Bharat / city

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघिणीची कोरोना चाचणी, उद्या येणार अहवाल - सिद्धार्थ उद्यानातील करीनाची घेतली कोरोना चाचणी

करीना ही सिद्धार्थ उद्यानातील सहा वर्षांची वाघीण रविवारपासून आजारी आहे. दोन दिवसापासून तिचे खाणे-पिणे खूपच कमी झाले होते. त्यामुळे तिच्यात कमालीचा अशक्तपणा आहे. खबरदारी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज करिना वाघिणीच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. यावेळी तिची करोना चाचणीसुद्धा घेण्यात आली आहे.

auranbagad
सिद्धार्थ उद्यानातील करीना वाघीण
author img

By

Published : Jun 23, 2020, 8:52 PM IST

Updated : Jun 23, 2020, 9:17 PM IST

औरंगाबाद - सध्या माणूस आजारी पडला की त्याच्यावर उपचार करताना आधी त्याला कोरोना झालाय का ? हे तपासलं जाते. मात्र आता प्राणी आजारी पडल्याने आधी त्याची कोरोना चाचणी केल्याचं औरंगाबादेत समोर आलं आहे. सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघीण आजारी असल्याने तिची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघिणीची कोरोना चाचणी, उद्या येणार अहवाल

औरंगाबाद महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील करीना ही सहा वर्षांची वाघीण रविवारपासून आजारी आहे. दोन दिवसापासून तिचे खाणे-पिणे खूपच कमी झाले होते. त्यामुळे तिच्यात कमालीचा अशक्तपणा आहे. खबरदारी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज करिना वाघिणीच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत. यावेळी तिची करोना चाचणीसुद्धा घेण्यात आली आहे. तो अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे.

सध्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार उडवला आहे. त्यामुळे नियमित आजाराला देखील संशयाच्या नजरेने पाहिलं जात आहे. सर्दी, खोकला अशा नियमित असलेल्या आजारावर औषध देताना कोरोना झालाय का ? याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्याचाच प्रत्यय औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात आला. सहा वर्षाची वाघीण आजारी असल्याने तिच्यावर उपचार करताना वैद्यकीय अधिकारी यांनी पीपीई कीट घालूनच वाघिणीच्या लाळेचे नुमने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामुळं वाघिणीला कोरोना तर झाला नाहीना ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, प्राणी संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी कोरोनाची भीती फेटाळली आहे. आजारी असल्याने तपासणी सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता करिनाचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावरच खरी परिस्थिती समोर येईल, हे नक्की.

Last Updated : Jun 23, 2020, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.