औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी पंप गृहात ( Jayakwadi pump house ) उंदीर गेल्यामुळे 13 तास पाणी उपसा बंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाण्याचे वेळापत्रक पूर्ण कोलमडले असून ते सुरळीत होण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार आहे. ( Disruption of water supply )
उंदरामुळे पाणी पुरवठा झाला बंद : सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास जायकवाडी पंपगृहात पंप क्रमांक चार जवळ फिडर मध्ये उंदीर घुसला, त्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने ट्रांसफार्मर खराब झाले. दुरुस्तीसाठी तब्बल तेरा तासांचा अवधी लागला. या काळात शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. सोमवारी दिवसभर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना हाल सोसावे लागले. त्यात पाणीपुरवठ्याचे पूर्ण वेळापत्रक कोलमडल्याच पाहायला मिळालं असून ते सुरळीत होण्यासाठी अजून दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेहमीच होतो पाणीपुरवठा विस्कळीत : शहराला चौदाशे आणि सातशे मिली व्यासाच्या जलवाहिनी द्वारे पाणीपुरवठा केला जातो मागील आठवड्यात सातशे मिली व्यासाची जलवाने बिडकीन फरशी फाटा येथे फुटली होती. त्यामुळे जवळपास तिला दुरुस्त होण्यास 30 ते 35 तासांचा कालावधी लागला. त्यावेळेसही पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यानंतर पंप गृहात तांत्रिक बिघाड होण्याच्या घटना, पाणी गळती, पाणी चोरी यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार वाढत असल्याने याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतं आहे.