ETV Bharat / city

राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव-देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर टीका - औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक

भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवित आहेत. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे. यासाठी आमच्या सरकारने कामे केली आहेत. मात्र, या राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 23, 2020, 12:13 PM IST

Updated : Nov 23, 2020, 12:50 PM IST

औरंगाबाद- राज्य सरकारने घोषणा करूनही वीजेची सवलत दिली नाही. एकत्रित बिल करून ग्राहकांना वाढीव युनिटचे बिल दिले आहे. मंत्र्यांना अभ्यास नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यामुळे राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याचे समोर आल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

भाजपतर्फे शिरीष बोराळकर यांना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवित आहेत. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की दुष्काळमुक्त मराठवाडा झाला पाहिजे. यासाठी आमच्या सरकारने कामे केली आहेत. मात्र, या राज्य सरकारने अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. मराठवाड्याचे प्रमुख शहर असलेल्या १६८० कोटी पाणीपुरवठ्यासाठी औरंगाबादला दिले आहे. इतर शहरांनीही निधी दिला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहेत. मात्र, सरकारने कोणतीही मदत केली नाही. कापूस खरेदी केंद्रही सुरू केले नाही.

राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

हेही वाचा-...तरच घोषणा करा; वीजबिलप्रश्नी फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

वीज बिल माफ करण्याबाबतही सरकारने अचानक भूमिका बदलली आहे. त्यामुळे जनतेत रोष आहे. शिक्षकांना अनुदानाचा टप्पा उशीर दिला आहे. जवळपास सर्वच शिक्षकांचा दहा-बारा महिन्यांचे नुकसान झाले आहे. देशभरात मोदी सरकारवर जनतेने विश्वास दाखविला आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-2022 मध्ये मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता - फडणवीस

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहे. तरीही पेट्रोल व डिझेलवर केंद्र सरकारकडून सवलत दिली जात नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर विचारले असता फडणवीस म्हणाले, पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकारकडून सर्वाधिक सवलत दिली जाते.

बुलडाण्यातही फडणवीसांनी केली महाविकास आघाडीवर टीका

कोरोनानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला असून निवडणुकीपुर्वी आरडाओरड करणाऱ्या कॉंग्रेसला जनतेने कात्रज घाट दाखवला आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी कॉंंग्रेसवर नुकतेच बुलडाण्यामध्ये केली आहे. ते अमरावती विभागाच्या शिक्षक मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रा.नितीन धांडे यांच्या प्रचारार्थ बुलडाण्यातील चिखली येथे आयोजित सभेत बोलत होते. राज्यात तुम्ही आम्हालाच निवडून दिले. मात्र, सत्तेसाठी आपल्या मित्रपक्षाने बेईमानी केली. नादान पक्षासोबत हातमिळवणी केली, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

Last Updated : Nov 23, 2020, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.