मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शुक्रवार 17 सप्टेंबर) रोजी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान, मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे.
असा असेल दौरा -
मुंबईहून सकाळी 7.30 वाजता विमानाने औरंगाबादकडे रवाना होतील. त्यांचे सकाळी 8.25 वाजता चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल. तर सकाळी 8.45 वाजता मुख्यमंत्री हे सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 9 वाजता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. सकाळी 9.30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि पैठण येथील संतपीठाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाने दिली आहे. तसेच या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी 10.40 वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी नांदेड दौऱ्यावर; मुदखेड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन