ETV Bharat / city

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration : औरंगाबादेत सर्वाधिक उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : भारतातील सर्वाधिक उंचीच्या औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा ( Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 32 फुटांचा चौथरा, 21 फुटांचाआहे. शुक्रवारी रात्री त्याचे अनावरण झाले.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
author img

By

Published : Feb 18, 2022, 11:02 PM IST

Updated : Feb 19, 2022, 3:21 AM IST

औरंगाबाद - 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भारतातील सर्वात उंच अशा अश्वारुढ पुतळ्याचे ( Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने सोहळ्यात सहभागी झाले. या प्रसंगी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, खा. इम्तियाज जलील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण

आकर्षक रोषणाई, फटाक्यांच्या आतिषबाजीत लोकार्पण -

औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील पुलाची निर्मिती झाल्यावर पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी अशी अनेक शिवभक्त नागरिकांची मागणी होती. ही मागणी मान्य करत औरंगाबाद महापालिकेने २०१९ ला मान्यता दिली. या पुतळ्याची उंची २१ फूट असुन चौथऱ्याची उंची ३१ फुट आहे. जमीनीपासून तब्बल ५२ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला असुन पुतळ्याचे वजन ७ मेट्रिक टन आहे. पुतळ्याखाली असलेल्या चौथऱ्याभोवती २४ कमानीमधे २४ मावळ्यांच्या प्रतिकृती आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या वास्तुने प्रेरित होत या चौथऱ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा भव्य अशा आकर्षक रोषणाईने, फुलांच्या सजावटीने, फटाक्यांच्या आतिषबाजीने व शिवप्रेमी जनतेच्या उत्साहात हा संपन्न झाला.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Inauguration
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

लाईट शो ठरला आकर्षण -

रात्री अकराच्या सुमारास लाईट शो करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी हजारो युवक तिथे जमले होते. जय शिवाजी जय भवानीचा नारा देत परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या भोवती तब्बल 1000 ढोल वादक ढोल वाजवून आपलं सादरीकरण करत होते. परिसरात पोवाडे आणि महाराजांचा गजर यावेळी करण्यात आला.

सर्वात मोठे स्मारक -

क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतातील सर्वात उंच स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा चौथरा विशेष आहे. या पुतळ्याची उंची २१ फूट असुन चौथऱ्याची उंची ३१ फुट आहे. जमीनीपासून तब्बल ५२ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला असुन पुतळ्याचे वजन ७ मेट्रिक टन आहे. पुतळ्याखाली असलेल्या चौथऱ्याभोवती २४ कमानीमधे २४ मावळ्यांच्या प्रतिकृती आहे.

हेही वाचा - Raosaheb Danve : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव, हॉटेलचे बिल न देताच गेले परत

Last Updated : Feb 19, 2022, 3:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.