औरंगाबाद - गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न पेटला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सहा वाजता शहरातील पुंडलिक नगर जलकुंभावर आंदोलन करण्यात आले. कमी दाबाने येणारे पाणी त्यातही दूषित पाणी यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी, नागरिक आणी महिलांनी जलकुंभावर चढून ठिय्या आंदोलन सुरू केले.
हेही वाचा - Rakesh Tikait in Aurangabad : राकेश टिकैत यांचे नव्या आंदोलनाचे संकेत
शहरातील पुंडलिकनगर भागातील अनेक वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच, पिण्यासाठी पुरवठा होणारे पाणी दूषित असल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप आहे. त्यामुळे, अखेर आज 14 एप्रिल रोजी पुंडलिकनगर भागातील महिला आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धडक देत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, यावेळी महिलांचा मोठ्याप्रमाणात सहभाग पाहायला मिळत आहे. तर, अनेक भाजपचे पदाधिकारी सुद्धा या आंदोलनात सहभागी असल्याचे पाहायला मिळाले.
महिलांनी तोडले कुलुप - पाणी पुरवठा सुरळीत नसल्याने पुंडलिकनगर भागातील महिला आणि नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. टाकीवर जाण्यासाठी लावण्यात आलेले कुलुप संतप्त महिलांनी दगडाने ठोकून तोडले आणि त्यानंतर जलकुंभाच्या परीसरात जाऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. काही नागरिक पाण्याच्या टाकीवरती जाऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले. त्यामुळे, शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर बनत चालला असल्याचे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Condoms found : भरखंडाळा-परसोडा रस्त्यावर दिसला कोंडमचा सडा