ETV Bharat / city

Babanrao Lonikar Audio Clip : महावितरण अभियंत्याला धमकी; लोणीकर म्हणाले, तो मी... - Babanrao Lonikar marathi news

भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर ( Bjp Mla Babanrao Lonikar ) यांनी अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल ( Babanrao Lonikar Audio Clip ) झाली. त्यावर तो मी नव्हेत असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले ( Babanrao Lonikar Audio Clip Clarification ) आहे.

Babanrao Lonikar
Babanrao Lonikar
author img

By

Published : Mar 30, 2022, 8:24 PM IST

औरंगाबाद - भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर ( Bjp Mla Babanrao Lonikar ) यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपयांचे वीजबिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदयांनी चक्क अभियंत्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली ( Babanrao Lonikar Audio Clip ) आहे. मात्र, त्यावर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिले ( Babanrao Lonikar Audio Clip Clarification ) आहे.

बबनराव लोणीकर म्हणाले की, औरंगाबादमध्ये माझा एक बंगला आहे. त्याचे बिल भरले असून वीज खंडित झालेली नाही. कोणीतरी खोटी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर टाकून मला बदनाम करत आहे. सध्या महावितरण करत असलेली कारवाई चुकीची असून, त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, असे स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिले आहे.

बबनराव लोणीकर स्पष्टीकरण देताना

काय आहे प्रकरण?

सध्या थकीत वीज बिल वसूली जोरात सुरु आहे. थकीत बिल न भरणाऱ्या लोकांची वीज कापण्यात येत आहे. औरंगाबाद मध्ये भाजपा आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बंगल्याचे साडेतीन लाख रुपये बिल बिल थकल्याने महावितरणने वीज कापली. त्यामुळे आमदार महोदय भडकले थेट त्यांनी थेट अभियंत्याला शिवीगाळ केली. चोरांना पकडत नाही आणि बिल भरणाऱ्याला त्रास देतात. माजले का तुम्ही या शब्दांत त्यांनी अभियंत्याला सुनावले. इतकेच नाही तर तुमच्यावर आयकर विभागाची धाड टाकेल. तुमची प्रॉपर्टीची कुंडली काढणार, ऊर्जा मंत्री माझे जवळचे नातेवाईक आहेत. त्यांना सांगून तुम्हाला निलंबित करेल, असे बबनराव लोणीकर यांनी सुनावल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

हेही वाचा - Ram Kadam Criticizes Mahavikas Aghadi : काँग्रेस आमदारांचे सोनिया गांधीना पत्र; राम कदम म्हणाले, बदल्या वसुलीसाठी....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.