ETV Bharat / city

सोशल डिस्टन्सचे पालन करत भाजपचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. अपयशी सरकार विरोधात औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : May 22, 2020, 6:11 PM IST

औरंगाबाद - कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने निदर्शन केली. काळे कपडे, काळे मास्क आणि काळे झेंडे घेऊन औरंगाबाद येथील उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर निदर्शन केली.

औरंगाबाद

केंद्र सरकारने भरघोस मदत करूनही राज्य सरकार राज्यासाठी मदत देऊ शकले नाही. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. त्याचबरोबर नागरिकांचे देखील हाल होत आहेत. हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी सरकारने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात आली.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. अपयशी सरकार विरोधात औरंगाबादेत आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन शिथिल असलेल्या वेळेत सोशल डिस्टन्सचे पालन करत उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर काळे कपडे, काळे मास्क आणि काळे झेंडे घेऊन अपयशी असलेल्या राज्य सरकारचा निषेध करत भाजपने 'मेरा आंगण मेरा रणांगण' महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले.

शेतकरी आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज का दिले नाही? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप कुठल्याही रुग्णालयात जाऊन पाहणी केलेली नाही. राज्यात एक दोन मंत्री सोडले तर सर्वच मंत्री घरात दडून बसलेत, राज्याच्या जनतेकडे पाहायला तयार नाहीत, असा आरोप भाजप आमदार अतुल सावे यांनी केला.

केंद्र सरकारने मदत दिली असताना ती मदत सर्व सामान्य जनतेला देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शहराध्यक्ष संजय केणेकर आणि अनिल मकरिये यांनी केला आहे. औरंगाबादच्या आंदोलनात माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सहभाग घेतला तर अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या अंगणातच काळे मास्क लावून राज्य सरकारचा निषेध नोंदवला. औरंगाबादच्या आंदोलनाचा आढावा घेत शहराध्यक्ष संजय केणेकर, आमदार अतुल सावे, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.