ETV Bharat / city

औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकात नियम धाब्यावर बसवत वाढदिवस साजरा - औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानक वाढदिवस साजरा

मध्यवर्ती बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी दिपक बगाडे या वाहक कर्मचाऱ्याचा वाढदिवस लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून साजरा केला. थेट बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर केक कापून वाढदिवस साजरा केला.

Birthday celebrations at Aurangabad Central Bus
वाढदिवस साजरा
author img

By

Published : May 11, 2021, 10:23 PM IST

Updated : May 11, 2021, 10:35 PM IST

औरंगाबाद - शहरातील मध्यवर्ती बस स्थानक प्रमुखांच्या उपस्थितीत एका एसटी वाहकाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी 25 ते 30 कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

मध्यवर्ती बस स्थानकात नियम धाब्यावर बसवत वाढदिवस साजरा

मध्यवर्ती बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी दिपक बगाडे या वाहक कर्मचाऱ्याचा वाढदिवस लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून साजरा केला. थेट बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी 25-30 सहकारी कर्मचारी जमलेले होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. वाढदिवसाला कर्मचाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकारी आगार प्रमुख शिंदे देखील यावेळी उपस्थित होते.

या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. यामुळे या कर्मचार्‍यांवर कारवाई होईल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Last Updated : May 11, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.