औरंगाबाद - राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. औरंगाबादमधे भाजप महिला मोर्चाच्यावतीने निदर्शन करण्यात आली. विद्या चव्हाण यांच्या फोटोला चपलांचा हार घालून भाजपने जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्या विरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलगा होत नसल्याने विद्या चव्हाण यांनी छळ केल्याच त्यांच्या सुनेच म्हणणे आहे. त्या विरोधात भाजप महिला मोर्चाने आंदोलन केले.
हेही वाचा - मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
विद्या चव्हाण यांनी केलेलं कृत्य राजकीय नेत्याला शोभणारे नसल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाकडून करण्यात आला. मुलगी नको मुलगा पाहिजे ही भूमिका चुकीची आहे, एकीकडे आपण मुलगा-मुलगी समानतेच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे मुलासाठी सुनेचा छळ करणे ही बाब चुकीची आहे. त्यामुळे भाजपने विद्या चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन केले असे भाजप महिला मोर्चा कडून सांगण्यात आले.
हेही वाचा - 'त्या' घटनेने लागला लळा.. आता करतो 100 भटक्या कुत्र्यांचा सांभाळ
औरंगाबादच्या गुलमंडी भागात विद्या चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्या चव्हाण यांना पक्षातून काढून टाकायला हवे. मुळात ही त्यांची एकाची अशी वृत्ती नसून राष्ट्रवादी पक्षच अश्या लोकांनी भरलेला असल्याचा आरोप भाजप महिला शहर अध्यक्षा माधुरी अदवंत यांनी केला. विद्या चव्हाण यांच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे. या प्रकरणात महिला आयोगाकडेदेखील धाव घेणार असल्याचे भाजप महिला मोर्चाकडून सांगण्यात आले. औरंगाबादच्या गुलमंडी भागात झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतला आहे ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.