ETV Bharat / city

Ajantha Road : पर्यटनाच्या राजधानीत अजिंठा रस्ता रखडला; पर्यटक नसल्याने व्यवसाय अडचणीत - औरंगाबाद अजिंठा

Ajantha Road : जगप्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- जळगाव ( Aurangabad Ajantha Jalgaon Road ) या रस्त्याचे कामाला 2015 मध्ये मान्यता मिळाली होती. 2016 मध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. ( Tourist business trouble ) 2 वर्षात म्हणजेच 2018 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होतं. मात्र, या कामाला सुरू होऊन आता तब्बल 6 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी अद्याप हा रस्ता काही पूर्ण झाला नाही.

पर्यटनाच्या राजधानीत अजिंठा रस्ता रखडला
पर्यटनाच्या राजधानीत अजिंठा रस्ता रखडला
author img

By

Published : Jul 28, 2022, 2:25 PM IST

औरंगाबाद - जागतिक वारसा स्थळ अशी मान्यता असणारा अजिंठा रस्ता होणार तरी कधी ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या 6 वर्षे रस्त्याचे काम सुरू असूनही अद्याप काम पूर्ण नसून एकवर्षात रस्ता होईल का ? यावर प्रश्न असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत, तर अनेक पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी पर्यटक व्यावसायिकांना तीनशेहून अधिक कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.

पर्यटनाच्या राजधानीत अजिंठा रस्ता रखडला

6 वर्षात काम पूर्ण होईना - जगप्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- जळगाव या रस्त्याचे ( Aurangabad Ajantha Jalgaon Road ) कामाला 2015 मध्ये मान्यता मिळाली होती. 2016 मध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. 2 वर्षात म्हणजेच 2018 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होतं. मात्र, या कामाला सुरू होऊन आता तब्बल 6 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी अद्याप हा रस्ता काही पूर्ण झाला नाही. ( Ajantha Road ) या कामांमध्ये आत्तापर्यंत 3 ठेकेदारांचे काम बदलण्यात आले. तरीही हा रस्ता का होत नाही, याचे उत्तर मात्र कोणत्याही विभागाकडे नाही.

2 तासांच्या रस्त्याला लागतात 4 तास - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आतापर्यंत 3 वेळा रस्ता लवकर पूर्ण होईल, असं आश्वासन दिले आहे. मात्र, त्यावर प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. औरंगाबाद अजिंठा तसं 110 किलोमीटरचे हे अंतर आहे. मात्र, हे अंतर कापण्यासाठी तब्बल 4 तासांचा वेळ लागत आहे. सकाळी निघल्यावर जाण्याचे चार तास आणि येण्याचे चार तास असे आठ तास पर्यटकांना प्रवासातच घालवावी लागत आहेत. ( Tourist business trouble ) जर रस्ता चांगला असता, तर हे अंतर अवघ्या दोन तासात कापणे शक्य होतं. मात्र तसं होत नसल्याने पर्यटक मात्र त्रस्त झाले आहेत. रस्त्याच्या अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहेत. ( Aurangabad Ajantha Jalgaon Road ) जवळपास 25 ठिकाणी काम ही अद्याप सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही ठिकाणी पुलांचे काम अर्धवट स्थितीत आहे. तर काही ठिकाणी भूसंपादनाचा वाद आहे. तर काही ठिकाणी ठेकेदारांनी काम हे चांगलं केलं नाही. या अशा कारणांमुळे हा रस्ता अद्याप अपूर्ण राहिला आहे. परिणामी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीकडे पर्यटक पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्याचा खर्च वाढला - 2015 मध्ये औरंगाबाद ते जळगाव या जवळपास दीडशे किलोमीटरच्या रस्त्याचे कामाला मंजुरी मिळाली. यावेळी बाराशे कोटींचे त्याचा खर्च हा प्रस्तावित होता. हा रस्ता दोन पदरी नियोजित असताना तो चार पदरी करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याचा खर्च दीड हजार कोटी पर्यंत करण्यात आला. चौपदरी रस्त्याला 48 मीटर जागा लागते. मात्र, मंजूर बजेटमध्ये राष्ट्रीय महामार्ग निकषांमधे चार पदरी शक्य नव्हता. त्यामुळे 23 मीटरचा रस्ता 30 मीटर करून त्याला चौपदरी करण्यात आले आहे. आणि त्यासाठी खर्च हा वाढवण्यात आला. तरी मात्र रस्त्याचे कामांचे निकष पाळले जात नसल्याचा समोर आलं आहे. ( Aurangabad Ajantha Jalgaon Road ) इतकच नाही तर गेल्या सहा वर्षात या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण होत नसल्याने, त्याला लागणाऱ्या साहित्यांचे किंमती मात्र वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचा खर्च अजून वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे.

व्यावसायिकांना बसतोय फटका - औरंगाबाद अजिंठा या रस्त्यामुळे पर्यटकांना मोठ नुकसान सोसावं लागत आहे. या रस्त्यांवर असलेले हॉटेल्स दुकान या सर्वांचा विचार केला तर, अनेक पर्यटकांनी पाठ फिरवल्याने आर्थिक नुकसान यांना सोसावं लागत आहे. फर्दापूर टी पॉइंटवर 78 दुकान आहेत. औरंगाबाद ते अजिंठा लेणीपर्यंत अनेक हॉटेल ढाबे आहेत. तसेच अजिंठा लेणी परिसरात 150 हॉकर्स 100 च्या हून अधिक टॅक्सी चालक डोलीवाले या सर्वांचे अर्थचक्र अडचणीत सापडले आहे. ( Tourist business trouble ) टूर ऑपरेटर, इतर व्यावसायिक यांना मागील काही वर्षात तीनशे कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. आता पर्यटक सुद्धा इकडे यायला नको म्हणत आहेत. त्यामुळे आता ठोस नियोजन केल, तर काम पूर्ण करावं लागेल. अन्यथा गेलेल्या पर्यटकांना परत आणणे अवघड असल्याचे मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंह यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - Gang Rape In Nagpur District: अकरा वर्षीय मुलीवर आरोपींचा सामूहिक बलात्कार

हेही वाचा - Breaking : राज्य सरकारला आणखी धक्का; 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.