ETV Bharat / city

Man Use Horse For Travelling : पेट्रोलचे दर वाढल्याने 'तो' वापरतोय अश्व, शहरात आकर्षण

इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत ( Petrol Rates Hike ) आहेत. त्यामुळे वाहन वापरणे परवडत नसल्याने औरंगाबादच्या एका व्यक्तीने दुचाकीऐवजी अश्व वापरण्यास सुरुवात ( Man Use Horse For Travelling ) केली आहे.

author img

By

Published : Dec 11, 2021, 5:04 AM IST

Updated : Dec 11, 2021, 6:51 AM IST

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

औरंगाबाद - इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे वाहन वापरणे परवडत नसल्याने औरंगाबादच्या एका व्यक्तीने दुचाकीऐवजी अश्व वापरण्यास सुरुवात ( Man Use Horse For Travelling ) केली आहे. युसुफ शेख, असे त्यांचे नाव असून ते एका खासगी रुग्णालयात नोकरीस आहे. घेड्यावरून शहरात फिरत असल्याने ते सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

बातचित करताना प्रतिनिधी

घोड्यावरुन रोज होतो 30 किलोमीटर प्रवास ...

इंधन दरवाढ ( Petrol Rates Hike ) व नवीन वाहनांचे वाढलेले दर ही सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब झाली आहे. युसुफ शेख यांच्याकडे असलेले वाहन जुने झाले असून त्यात पेट्रोल अधिक लागत असल्याने ते त्रस्त होते. मिटमिटा भागातून नोकारीच्या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी 30 किलोमीटर अंतर कापावे लागते. त्यामुळे युसुफ यांनी घोड्यावर जाण्याच ठरवले. मागील सहा महिन्यांपासून ते रोज त्यांच्या कामाच्या ठिकाणी घोड्यावरून ये-जा करू लागले. शहरात ज्या ठिकाणी त्यांना काम असते त्या ठिकाणी ते घोड्यावरून प्रवास करतात. इतकेच नाही तर कौटुंबिक समारंभातही ते घोड्याचा वापर करू लागले. घोडा वापरत असताना वेगळाच आनंद मिळत असल्याचे युसुफ यांनी सांगितले.

पैशांची होत आहे बचत ...

दुचाकी वापरत असताना रोज लागणारे इंधन पाहता महिन्याकाठी पेट्रोलसाठी चार ते पाच हजारांचा खर्च येत होता. मात्र, घोड्याचा वापर करत असल्याने खर्चात कपात झाली आहे. इतकेच नाही तर रोज फिरण्याचा प्रमाणही नियंत्रणात आल आहे. दिवसाकाठी 50 ते 60 रुपये म्हणजेच महिन्याला दीड ते दोन हजार रुपये खर्च घोड्यासाठी लागत आहे. त्यामुळे पैशांची बचत होत असून वेळही वाचत असल्याचे मत युसुफ शेख यांनी व्यक्त केले.

घोड्यामुळे ठरत आहे आकर्षण ...

रोज घोड्यावर प्रवास करत असताना वेगवेगळे अनुभव येत आहे. अनेक प्राणीमित्र आकर्षणाने बघत आहेत. तर काही जण फोटो काढण्याचा आग्रह करतात. दुचाकीवर फिरत असताना कोणीही पाहत नव्हते. मात्र, घोड्यावरुन जाताना बहुतांश लोक वळून पाहतात. घोडा वापरत असल्याचा कौतुक करतात. इतकेच नाही तर घोड्याबाबत माहिती जाणून घेतात. तर काही जण आवर्जून चहादेखील पाजतात. त्यामूळे वेगळाच अनुभव येत असल्याचे मत युसुफ शेख यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा - Subhash Desai : दोन वर्षात राज्यात 126 नवीन कंपन्या, उद्योगमंत्र्यांची माहिती

Last Updated : Dec 11, 2021, 6:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.