ETV Bharat / city

Yashomati Thakur : केंद्र, राज्याच्या संघर्षामध्ये देशाचे तुकडे पडणार; यशोमती ठाकूरांनी व्यक्त केली भीती - Yashomati Thakur Agitation Against Inflation

केंद्र सरकार करणार ते सोन्याहून पिवळ आणि राज्य सरकार करणार एकदम गटार बनली आहे, असे काही सांगण्यात येत आहे. ते अत्यंत घातक असल्याची प्रतिक्रिया यशोमती ठाकूर ( Minister Yashomati Thakur ) यांनी व्यक्त केली आहे.

Yashomati Thakur
Yashomati Thakur
author img

By

Published : Apr 4, 2022, 5:30 PM IST

अमरावती - महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरचे दर प्रचंड वाढले आहेत. परिस्थिती अतिशय बिकट असताना केंद्र सरकार जे काही करणार ते सोन्याहून पिवळ आणि राज्य सरकार एकदम गटर बनली, असा जे काही सांगण्यात येत आहे. ते अत्यंत घातक प्रकार असून भविष्यात देशाचे तुकडे करणारा असल्याची भीती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली ( Minister Yashomati Thakur ) आहे. केंद्र आणि राज्य सरकार मध्ये वाद नसावा दोघांचेही अधिकार अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

यशोमती ठाकूर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अमरावती शहरातील इरविन चौक येथे महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात ( Yashomati Thakur Agitation Against Inflation ) आले. यावेळी यशोमती ठाकूर यांनी वाढत्या महागाई विरोधात केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार जे काही करणार तेच योग्य असा जो काही समज पसरविला जात आहे तो देश हिताचा नाही. महागाईविरोधात काँग्रेस सातत्याने आंदोलन करीत असले, तरी आता सर्वसामान्य जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

राज ठाकरेंनी अपेक्षांवर पाणी फेरले - राज ठाकरे वास्तविकते पासून दूर जात आहे. खऱ्या समस्या त्यांना माहिती नाहीत का? असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला. गुढीपाडव्याच्या पर्वावर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्याबाबत महाराष्ट्राला असणाऱ्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. राज ठाकरे यांनी अचानक यू टर्न घेतला असून, यामागे काही अॅडजेसमेंट झाली आहे का, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला ( Yashomati Thakur On Raj Thackeray ) आहे.

हेही वाचा - Anil Deshmukh At Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे जे रुग्णालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.