ETV Bharat / city

अमरावती : वडाळी तलाव ओव्हरफ्लो; परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

वडाळी तलावातील पाणी सुरक्षा भिंतीवरून कोसळून वाहत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अंबा नाल्याला पूर आला आहे.

Wadali Lake
Wadali Lake
author img

By

Published : Sep 9, 2021, 5:17 PM IST

अमरावती - अमरावती शहरातील वडाळी तलाव मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. वडाळी तलावातील पाणी सुरक्षा भिंतीवरून कोसळून वाहत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अंबा नाल्याला पूर आला आहे. त्यामुळे तलाव परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

व्हिडीओ

1889मध्ये तलावाचे बांधकाम -

शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागातील टेकड्यांवरून खाली वेगाने येणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यासाठी 1889मध्ये इंग्रज शासकांनी वडाळी तलाव बांधला. या तलावाला सहाय्यभूत बनवून फुटका तलाव आणि भवानी तलावाची निर्मिती 1899मध्ये करण्यात आली. पूर्वी शहरातील कॅम्प परिसरात वडाळी तलावातून पाणीपुरवठा केला जात होता. त्यासाठी तलावाच्या पायथ्याशी जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली होती. टेकड्यांवरून वाहत येणारे पाणी आधी भवानी तलावात आणि भवानी तलावाची पातळी ओलांडल्यावर पाच किलोमीटर अंतरावरील फुटक्या तलावात यायचे फुटका तलाव तुडुंब भरल्यावर त्यात पाणी वडाळी तलावात पोचते, अशी व्यवस्था आहे. वडाळी तलावाचे पाणलोट क्षेत्र दोन चौरस मैल असून तलावाची क्षमता दोन दशलक्ष घनमीटर एवढी आहे. तलावाने 21 हेक्‍टर जागा व्यापली आहे. त्यापैकी निव्वळ तलावाखालील जमीन वीज पॉईंट 99 हेक्टर आहे. तलावाच्या मध्यभागाची खोली 18 मीटर इतकी आहे.

जलकुंभीमुळे तलाव झाला खराब -

अमरावती महापालिकेच्या मालकीचा असणाऱ्या वडाळी तलावात चिला या वनस्पतीसह कमळाची झाडे उगवली आहेत. यांनी संपूर्ण तलाव व्यापला असून या तलावाची गत अनेक वर्षांपासून सफाई केली नसल्यामुळे हा तलाव खराब झाला आहे. 2012मध्ये तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर अंबा नाल्याला पूर येऊन नाल्याच्या काठी असणाऱ्या अनेक भागात पाणी शिरले होते. 2013 ते 2018पर्यंतच्या पाच वर्षाच्या कालावधीत हा तलाव भरलाच नव्हता. 2019 आणि 2020मध्ये तलावाने पुन्हा पातळी गाठली असताना या वर्षी बऱ्याच उशिराने वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

फुटक्या तलावातील पाणी वनविभागाने अडवले -

इंग्रज शासकांनी भवानी तलावाचे पाणी फुटक्या तलावात आणि पुढे फुटका तलावाचे पाणी वडाळी तलावात पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, गत काही वर्षांपासून वनविभागाने फुटक्या तलावातील पाणी अडवून ते वडाळी तलाव आत येऊ दिले नाही. यावर्षी फुटक्या तलावातून निघणारे पाणी महादेव खोरी आणि यशोदा नगर परिसरात वाहून गेल्यामुळे त्या भागात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. आता काही दिवसांपूर्वी मात्र वनविभागाने पुढच्या तलावाचे पाणी पुन्हा वडाळी तलावाकडे वळवल्यामुळे वडाळी तलावाची पातळी घातली गेली आहे.

नाल्याकाठी राहणार्‍यांना सतर्कतेचा इशारा -

वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या अंबा नालाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसनगर, फ्रेजरपुरा, अंबापेठ, नमुना आदी परिसरात नाल्याकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा - ...अन् आमदार रवी राणांनी अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून चालविले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.