अमरावती - कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज देशव्यापी ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र दिल्लीत या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
शेतकरी आंदोलन दडपण्याच काम-
शेतकरी मोर्चाचा नियोजित रूट ब्लॉक करण्यात आला. व असामाजिक तत्वाचे लोक या मोर्चात घुसवले गेले, असा खळबळजनक आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. तर हे केंद्र सरकारचे मोठे अपयश आहे. व शेतकरी आंदोलन दडपण्याच काम केंद्र सरकार करत असून हे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंजबा-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी हरीत क्रांती केली-
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला 61 दिवस आता पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांचे अभूतपूर्व आंदोलन सुरू आहे. केंद्राने केलेले कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांनी देशाला पोसले आहे. त्यांच्यावर ही वेळ येणे दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. आज प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करतोय, पण आज काळा दिवस आहे अशी टीकाही थोरात यांनी केली आहे. चर्चेच्या 10 फेऱ्या झाल्या मात्र काहीही तोडगा निघालेला नाही. पंतप्रधानांनी साधी दखलही घेतली नाही. पंजबा-हरयाणाच्या शेतकऱ्यांनी हरीत क्रांती केली. त्यांची मागणी सरकारने ऐकली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसची भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- कोरोना दिलासा..! देशात गेल्या 7 महिन्यांमधील सर्वात कमी रुग्णांची नोंद