मुंबई - तळेगाव येथे होणारा वेदांता ग्रुपचा सेमी कंडक्टर व डिस्प्ले फेब्रिकेशन चा प्रकल्प (Vedanta Groups project) गुजरातमध्ये गेला आहे. यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने हस्तक्षेप करून; तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात (Vedanta Groups project brought back to Maharashtra) आणावा, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ajit Pawar demand to CM) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पवारांची मुख्यमंकत्र्यांकडे मागणी : महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण असणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प तळेगाव एमआयडीसीत साकारण्यात येणार होता. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष प्रयत्न करण्यात आले होते. त्यादृष्टीने सर्व पुर्तता करण्यात आली होती. मात्र दोन लाख कोटींची गुंतवणुक असणारा आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा हा महत्वपूर्ण प्रकल्प, गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्रासाठी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून; राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणावर याचा दीर्घकालीन परिणाम होणार आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा. महाराष्ट्राबाहेर जाणारी गुंतवणुक थांबवत; हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी, विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
कंपणी उभारणीस तळेगांव योग्य ठीकाण : वेदांता ग्रुपचा सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा तळेगांव येथे येणारा प्रकल्प राजकीय दबावापोटी गुजरात येथे नेण्यात आला आहे. वेदांता व तेवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचे ६०:४० असे जॉईन्ट व्हेंचर झाले आहे. सर्वसाधारणपणे २ लाख कोटींची गुंतवणूक व अंदाजे १.५ लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प उभारणीसाठी या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलगांणा व आंध्र प्रदेश या राज्याबरोबर चर्चा केली. जागा निवडीसाठी एकुण १०० मुद्दांचा विचार करुन त्यांनी तळेगांव टप्पा ४ ही जागा अंतिम केली. तळेगांव येथील त्यांना आवश्यक असणारे इकोसिस्टिम, अॅटोमोबाईल व इलेक्ट्रीक हब, रस्ते , रेल्वे व एअर कनेक्टीव्हिटी, जेएनपीटीशी असणारी कनेक्टीव्हिटी, उपलब्ध असणारे तांत्रिक मनुष्यबळ व महाराष्ट्र राज्याचे गुंतवणूक धोरण हे पोषक असल्याने त्यांनी तळेगांव येथील १ हजार एकर जागेची निवड केली होती. वेदांताच्या वरीष्ठ टीमने सर्व बाबींचा विचार करुन तळेगांव हेच ठिकाण योग्य असल्याचे सुचविले आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने त्यांना बऱ्याच सवलती देण्याचे मान्य केल्याचे कळते.
राजकीय दबावापोटी निसटतोय प्रकल्प : मात्र वरीष्ठ राजकीय दबावापोटी ही गुंतवणूक गुजरात येथे नेण्यात आली आहे. हा प्रकल्प गुजरातमधील धोलेरा येथे प्रस्तावित आहे. या ठिकाणी तळेगांवच्या तुलनेत काहीच नाही. गुजरातचे मुख्यमंत्री व वेदांतचे प्रमुख हे सांमजस्य करार करणार आहेत. अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी राज्य सरकारने लागेल ते करावे, पंरतू ही गुंतवणूक जाऊ देऊ नये. यामुळे महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. कारण यामधून मोठया प्रमाणावर GST मिळणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा; यासाठी सर्व ते प्रयत्न करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे.