अमरावती - महापालिकेने तारखेडा परिसरात ट्रक टर्मिनन्सचे काम अतिशय अभिनव आणि अत्यंत सुंदर झाले आहे. विकासाच्या प्रक्रियेत अनेक सेवांमध्ये ट्रक चालकांचेही मोठे योगदान आहे. या अद्यावत ट्रक टर्मिनन्समुळे अमरावतीच्या विकासाला गती येणार, असे वक्तव्य नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केले. ते ट्रक टर्मिनन्स, सभागृह आणि व्यापारी संकुलाचे लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या रथावर अब्दुल सत्तार सवार; पूरग्रस्तांसाठी २५ लाखाचा धनादेश दिला
महापालिकेने तयार केलेल्या ट्रक टर्मिनन्स, सभागृह आणि व्यापारी संकुलाचे लोकार्पण मंत्री योगेश सागर यांनी केले. सोहळ्याला अमरावतीचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार डॉ. सुनिल देशमुख, महापौर संजय नरवणे, माजी महापौर मिलिंद चिमोटे, महापालिका आयुक्त संजय निपाणे उपस्थित होते.
हेही वाचा - जीवनरेखा एक्सप्रेस नव्याने प्रवास करण्यासाठी सज्ज, जाणार छतीसगडच्या दौऱ्यावर
अमरावतीचे ट्रक टर्मिनन्स इतके दर्जेदार झाले आहे, की याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाठवणार, असेही नगरविकास राज्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी ट्रक टर्मिनन्स शहराच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार असून यामुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होणार आहे, असे म्हटले. विकास प्रक्रियेत हिंदू-मुस्लीम असा भेद न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने विकास साधण्यात येईल, असे ही ते म्हणाले.
हेही वाचा - पालकमंत्री डॉ. परिणय फुकेंच्या हस्ते नक्षलग्रस्त गावातील आरोग्य केंद्राचे उद्घाटन
जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या ठिकाणी असे ट्रक टर्मिनन्स होणे गरजेचे आहे, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. आमदार डॉ. सुनिल देशमुख यांनी विदर्भात पहिले अद्यावत ट्रक टर्मिनन्स अमरावतीत आकारस आले आहे. ट्रकच्या अनधिकृत पार्किंगला आता आळा बसेल असेही ते म्हणाले. या सोहळ्याला तारखेडा परिसरातील रहिवासी, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.