अमरावती: जिल्ह्यात ४ ते ५ दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे येथील अप्पर वर्धा (Upper Wardha Dam) धरणाच्या जलसाठ्यात तब्बल १७ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. यामुळे धरणाच्या एकुण जलसाठयात मोठ्या प्रमाणात वाढ (water level increased) झाली आहे. अप्पर वर्धा धरण क्षेत्राचा जलसाठा ६३ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे जिल्ह्याच्या काही भागात पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे.
अहवाल: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यमप्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे आहे:
विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालील प्रमाणे (मी.मध्ये)
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्ववर्धा (339.94), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (390.38), अरुणावती (326.17), बेंबळा (266.15), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (342.21), वान (398.92), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (289.01), पेनटाकळी (555.30), खडकपूर्णा (517.15)
हेही वाचा : Two Brothers Drowned In River : पिकनिकला गेलेल्या दोन भावांचा नदी पात्रात बुडून मृत्यु