अमरावती - जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचे असणारे अप्पर वर्धा धरण तुडुंब भरले आहे. या धरणातून पाण्याचा निसर्ग व्हावा यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 13 पैकी 9 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने सिंभोरा परिसराचे वातावरण आल्हाददायी झाले आहे.
मध्यप्रदेशात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातून वाहत येणाऱ्या नद्यांचे पाणी अप्पर वर्धा धरणात येत आहे. अप्पर वर्धा धरण 15 दिवसांपूर्वीच 100 टक्के भरले आहे. सुरुवातीला या धरणाची तेरापैकी दोन दारे उघडण्यात आली होती. त्यानंतर तीन दरवाजातून पाण्याचा विसर्ग केला जात होता. आता धरणात वाहत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढले असल्याने, धरणाचे एकूण 13 पैकी नऊ दरवाजे बारा सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आले आहेत. धारणातून 176 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.