ETV Bharat / city

Rana Couple Arrest : राणा दाम्पत्यावरीप राजद्रोहाचा गुन्हे मागे घ्या, शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांची मागणी - वासुदेवानंद सरस्वती नवनीत राणा अटक मागणी

महाराष्ट्रात घडलेले राजकीय अटकनाट्य अनुचित आहे. राज्य शासनाने राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा ( Swami Vasudevanand Saraswati On Ravi Rana Arrest ) गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी केली.

Swami Vasudevanand Saraswati On Ravi Rana Arrest

author img

By

Published : Apr 25, 2022, 10:50 PM IST

अमरावती - महाराष्ट्रात घडलेले राजकीय अटकनाट्य अनुचित आहे. राज्य शासनाने राणा दाम्पत्यावरील राजद्रोहाचा ( Swami Vasudevanand Saraswati On Ravi Rana Arrest ) गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी केली. त्यांच्या हस्ते अंजनगाव सुर्जी येथे भगवान बालाजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

अंजनगाव येथील मंदिरात भगवान बालजींची प्राणप्रतिष्ठा - अंजनगाव सुर्जी येथीप काठीपुरा येथील बालाजी मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देवनाथ मठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराज, वाराणसी येथील शंकरानंद महाराज, आमदार बळवंत वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, सुर्जी येथील श्री देवनाथ मठातून बालाजी मंदिरापर्यंत रथयात्राद्वारे मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मंदिरासमोर व्यासपीठावर उपस्थित भक्तगणांनी प्रारंभी भजन व जयघोष केला. याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराज यांनी शहराचे महत्त्व विशद केले. या स्थानी हनुमंताची माता अंजनी यांनी तप केले. म्हणून या गावाचे नाव अंजनीग्राम पडले, असा पौराणिक दाखला असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शंकराचार्य यांनी हिंदू राष्ट्र संस्थापक शिवाजी महाराज यांचा गौरवाने उल्लेख केला. तसेच सर्व जाती-धर्माच्या लोकांनी राष्ट्रधर्म पाळावा, असे आवाहन केले. याच कार्यक्रमात मंदिर उभारणीस हातभार लावणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

लाकडी रथाने जनतेचे लक्ष वेधले - देवनाथ मठातील लाकडी रथ याप्रसंगी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यामधूनच जयपूर कारागिरांनी अतिशय सुंदररित्या तयार केलेल्या या रथावर भगवान बालाजी मूर्तीची मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. ठीक-ठिकाणी लाकडी रथावरील भगवान बालाजीच्या मूर्तीची भाविकभक्तांनी पूजा केली. शंकराचार्यांनीसुद्धा या रथाची प्रशंसा केली.

दरवर्षी व्हावी रथयात्रा - संपूर्ण राजस्थानी लाल दगडांनी निर्मित मंदिराची याप्रसंगी सजावट करण्यात आली होती. भक्तगण, महिला पुरुषांनी मंदिर प्रांगण फुलून गेले होते. देवनाथ मठातून दरवर्षी बालाजी मंदिरपर्यंत रथयात्रा निघावी आणि ही येथील परंपरा व्हावी, अशी इच्छा याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केली. या संपूर्ण सोहळ्यादरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

हेही वाचा - नवनीत राणांच्या पत्राची दखल; २४ तासांत अहवाल सादर करण्याचे लोकसभाध्यक्षांचे आदेश!

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.