अमरावती - दररोज डिझेलची होणारी दरवाढ एसटीसाठी लागणाऱ्या साहित्यांची वाढलेली किंमत ,कर्मचाऱ्यांचे पगार,आणि सातत्याने एसटीला असलेला तोटा या सर्व गोष्टींमुळे एसटी महामंडळाने मध्यरात्रीपासून तिकीटांच्या दरात जवळपास 17 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय सर्वसामान्य प्रवाशांना याचा एेन दिवाळीच्या तोंडावर फटका बसत आहे .पूर्वी 195 रुपयात होणारा अमरावती-नागपूरच्या एसटी प्रवासाला आता प्रवाशांना तब्बल 225 रुपये मोजावे लागत आहे. राज्यात दिवाळीत तोंडावर झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य लोकांनी नाराजी व्यक्त केली असून एसटीची दरवाढ होण्याला डिझेलच्या वाढणाऱ्या किमतीही कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया यावेळी प्रवाशांनी दिली. त्यामुळे डीझेलचे दर कमी करण्याची मागणी प्रवाशांनी केली. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी बातचीत केली आहे आमचे अमरावतीचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी.
राज्यांत एसटी तिकिटांची दरवाढ; पाहा सर्वसामान्य प्रवाशांची प्रतिक्रया...
इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांचे पगार यांचा ताळमेळ न बसल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळाने आता तिकीटांच्या दरात जवळपास 17 टक्क्यांनी वाढ केली आहे. अचानक दरवाढ केल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.