अमरावती - ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान भरपाई म्हणून मंगळवारी महाविकास आघाडी सरकारने 2860 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, यामध्ये विदर्भातील केवळ दोन जिल्ह्यांचा समावेश केला गेला होता. अमरावती विभाग म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राला नुकसानभरपाई यादीतून वगळण्यात आले आहे.
यावेळेस सर्वत्र असंतोष शेतकऱ्यांमध्ये दिसून आलेला होता. मात्र, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडे मागणी केली. त्यामुळे गुरूवारी सकाळी राज्य सरकारने नव्याने अधिसूचना जारी केली. यामध्ये राज्याच्या 9 जिल्ह्यांसाठी 7741 543 कोटीची मदत जाहीर केली. यामध्ये पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यासाठी 162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत जाहीर केली. त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे पश्चिम विदर्भातील 541007 शेतकऱ्यांना फटका बसला होता. यात 507626.56 क्षेत्र बाधित झाले होते.
514 कोटी रुपयांची केली मदत
अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंग यांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी 514कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र यापैकी162 कोटी 44 लाख 5 हजार रुपयांची मदत मिळाली आहे. यात अमरावती जिल्ह्यासाठी 5212.39 कोटी, अकोला 118.97, यवतमाळ 5664,00, बुलढाणा 4267 व वाशिम 981 कोटी 12 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. मात्र, ही मदत दिवाळीपूर्वी मिळाली पाहिजे ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
हेही वाचा - फोन टॅपिंग प्रकरणातील गोपनीय माहिती नवाब मलिक, आव्हाडांनी उघड केली, रश्मी शुक्लांचा दावा