ETV Bharat / city

Sanzagram Village : वाचा.  तीनशे मुली, महिलांना आधार अन् रोजगार देणाऱ्या सांझाग्राम गावाविषयी... - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाव

अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मालधूर गावानजीक "सांझाग्राम" या गावाची निर्मिती सुरू झाली आहे. पिडीत महिला, वृद्ध, अठरा वर्षांवरील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था हे या "सांझाग्राम" च्या माध्यमातून केले जात आहे.

Sazagram village
Sazagram village
author img

By

Published : Dec 11, 2021, 9:45 PM IST

Updated : Dec 12, 2021, 10:26 AM IST

अमरावती : पुरोगामी महाराष्ट्र राज्यात महिलांवर ,मुलींवर होणारे अत्याचार, अन्याय, कौटुंबिक कलह, मारहाण तिची होणारी हेळसांड या गोष्टी सातत्याने घडत असतात. अत्याचारग्रस्त पीडित महिलेकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन आजही बदललेला नाही. अन्यायग्रस्त महिला,मुली आजही कुचंबनेच जीवन जगत आहे. कारण अनेकदा अशा पीडित महिला, मुलींना रक्ताचे नातेवाईकही दूर सारतात. पण या पिडीत महिलांसाठी 'समर्पण' ही सामाजिक संस्था २००८ पासून काम करत आहे.

राज्यातील पाहिलं "सांझाग्राम" गाव

या पीडित महिलांच्या,मुलींच्या, दिव्यांग यांच्या पुर्नवसनाबरोबर त्यांना रोजगार प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनून समाजात ताठ मानेने जगण्याचा अधिकार दिला आहे. समर्पण या सामाजिक संस्थेने पीडित महिला,मुली, दिव्यांग, व निराधार मुलींसाठी सहा एकर जागेत एक गाव वसवण्याचा निर्णय समर्पणचे संस्थापक अध्यक्ष अमोल मानकर यांनी घेतला आहे. अमरावतीच्या गुरूकुंज मोझरी गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मालधूर गावानजीक "सांझाग्राम" या गावाची निर्मिती सुरू झाली आहे. पिडीत महिला, वृद्ध, अठरा वर्षांवरील अनाथ तरुण यांच्यासाठी दीर्घकाळ निवासाची व्यवस्था हे या "सांझाग्राम" च्या माध्यमातून केले जात आहे. पिडीत महिलांसाठी उभारलं जाणार राज्यातील हे पहिलंच गाव असल्याच समर्पण या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल मानकर यांनी सांगितलं.

Sazagram village
निराधार महिलांसाठी आसरा

तरुणांची साखळी
अकोला येथिल अमोल मानकर यांनी २००८ पासून या महिलांसाठी समर्पण संस्थेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली आहे.अमोल मानकर यांनी सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या उमद्या तरुणांची एक मोठी साखळी राज्यभर तयार केली आहे. या साखळीच्या माध्यमातून राज्याभरातील अन्यायग्रस्त महिलांना वेळोवेळी न्याय देऊन त्यांचं पुर्नवसन करण्याचं काम ही संस्था करत असते.राज्यातील विविध भागातील पीडित महिला व मुली या अमोल मानकर यांना संपर्क करतात. समर्पण या संस्थेचे राज्यात बारा ठिकाणी भाडेतत्त्वावर वसतीगृह आहे. या महिलांना व मुलींना आधार देऊन त्यांच्या अल्पकालीन निवासाची व्यवस्था केली जाते. त्यामुळे या पीडितासाठी "सांझाग्राम" नावाचे एक गावच वसवण्याचा निर्णय अमोल मानकर व त्यांच्या टीमने घेतला आहे.

Sazagram village
'समर्पण' संसथेचा उपक्रम
म्हणून होत आहे "सांझाग्राम"ची निर्मिती
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सानिध्यात समाजातील लोकांच्या सहकार्याने तयार होणाऱ्या या गावामागे एक मोठी संकल्पना देखील आहे."समर्पण" या संस्थेच्या "माहेर" या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ४९०० मुली आणि महिलांना अल्प आणि दीर्घकाळ निवास व्यवस्था करून दिली आहे. आता समर्पणने नवीन संकल्पनेला सुरुवात केली आहे. सर्वांच्या सहकार्याने "सांझाग्राम" ची निर्मिती होत असून या ठिकाणी महिला, वृद्ध दिव्यांग या सर्वाना एकत्रित स्वरूपात राहता येईल, खेळता येईल, त्यांनच्या हाताला रोजगार देता येईल आणि सर्वांना इथेच नातेवाईक सुद्धा मिळवून देता येईल या संकल्पनेतून या सांझाग्रामची निर्मिती होत आहे. या माहेर प्रकल्पात ३०० पेक्षा अधिक मुली व महिलांचा निवारा राहणार आहे.
Sazagram village
चार हजार एकर परिसरात पसरलेले गाव
२८ अत्याचारग्रस्त मुलीचा पुनवर्विवाहसमर्पण संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 4900 महिलांना समुपदेशन तसेच न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला गेला आहे.९७० महिलांना वसतिगृहामध्ये निवारा दिला गेला आहे. तर आतापर्यंत २८ अत्याचारग्रस्त मुलींचा सन्मानपूर्वक पुनर्विवाह ही लावून दिला असल्याची माहिती अमोल मानकर यांनी दिली.
सांझाग्राममध्ये "कबीरांनाही" सांभाळ
अनाथ आश्रम आणि बालसुधारगृह मध्ये बालकांचे वय १८ वर्षाचे झाल्यावर त्यांना तिथे ठेवता येत नाही. त्यांना बालसुधारगृह व अनाथाश्रम सोडावे लागते. अनाथ असणाऱ्या मुलांचे कुटुंबही राहत नाही. त्यामुळे बहुतांश मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. अशा मुलांसाठी अमोल मानकर यांनी 'कबीर' ही संकल्पना देखील पुढे आणली आहे .या माध्यमातून अशा निराधार तरुणांना रोजगार मिळावा,ओळख मिळावी,व हक्काचा निवारा मिळावा म्हणून त्यांचे "सांझाग्राम" मध्येही हक्काचे घर असणार आहे.इथं १०० तरुण वास्तव करू शकतील.
"सांझाग्राम" च नाव ठेवण्यामागे हे कारण
देशात अनेक गावांची अशी नावे आहेत की त्या नावामागे काहीतरी इतिहास दडलेला असतो.गावाच्या नावामागे ही अनेक सकारात्मक कारणे असतात. ते सांझाग्राम ला देखील आहेत.हे काम एका व्यक्तीचे नसून या "सांझाग्राम" प्रकल्पासाठी अनेक विचारांचे तरुण एकत्र आलेले आहे. सर्व तरुण एकत्र एऊन काम करतील ते म्हणजे "सांझा"तसेच विविध घटकांतील लोकांना एकत्र आणून त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी जे स्विकारतील त्या सांझा ला गावचे स्वरूप देतील म्हणून त्या गावाला 'सांझाग्राम' हे नाव देण्यात आले..
Sazagram village
सांझाग्राम" गाव
कामाची प्रेरणा
२००८ मध्ये अकोला जिल्ह्यातील एका गावात जातपंचायतीने एका मुलीवर अनन्वित अत्याचार केले त्यानंतर या मुलीने स्वतःला महिनाभर घरात कोंडून घेतले होते. अमोल मानकर यांच्या लक्षात ही बाब आली. त्यानंतर मानकर यांनी स्वतः त्या मुलीला स्वतःच्या घरात आश्रय दिला आणि या घटनेनंतर अमोल मानकर यांनी अशा अत्याचारग्रस्त मुली व महिलांसाठी काम करण्याचा निश्चय केला.आता समर्पण च्या माध्यमातून मागील तेरा वर्षापासून ते काम करत आहे.
सांझाग्रामला पद्मश्री डॉ. आमटे दाम्पत्याची भेटसमर्पण संस्थेच्या सांझाग्रामला लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी पद्मश्री डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी रविवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते प्रकल्पावर विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांच्याशी उपस्थितांनी चर्चाही केली.

Last Updated : Dec 12, 2021, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.